Crime News: एका महिलेने तिच्या विवाहबाह्य संबंध असलेल्या प्रियकराकडून आपल्याच मुलीचा बलात्कार केल्याची संतापजनक बातमी समोर आली आहे. 12 वर्षांच्या मुलीवर वारंवार बलात्कार केल्याबद्दल आरोपी महिलेला आणि तिच्या विवाहबाह्य संबंध असलेल्या प्रियकराला 180 वर्षांचा तुरुंगवास आणि 11.7 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याचं वृत्त आहे. विशेष पोस्को न्यायालयाच्या न्यायाधीशांनी आरोपी महिला आणि तिच्या प्रियकराला पोस्को, आयपीसी आणि बाल न्याय कायद्याच्या विविध कलमांखाली दोषी ठरवलं. संबंधित प्रकरण केरळमधील असल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT
दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा
न्यायालयाने प्रत्येक गुन्ह्यासाठी 40 वर्षांची शिक्षा आणि प्रत्येकी दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला. तसेच, दंड न भरल्यास अतिरिक्त 20 महिने तुरुंगवास भोगावा लागणार असल्याचे आदेश दिण्यात आले. त्यांनी सांगितलं की, प्रकरणातील महिलेला पॉस्को कायद्यांतर्गत देण्यात आलेली ही सर्वात कठोर शिक्षा आहे. सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, महिलेने तिरुअनंतपुरममध्ये तिच्या पती आणि मुलीसोबत राहत असताना आरोपी तरुणासोबत मैत्री केली.
हे ही वाचा: पाणी पित असताना विजेचा झटका बसला, मजूराचा दुर्दैवी मृत्यू! 11 वर्षांच्या मुलीवरुन बापाचं छत्र हरपलं
मुलीवर बलात्कार करण्यास आईनेच केली मदत
दोघांमध्ये प्रेमसंबंध झाल्यानंतर महिला तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. ती डिसेंबर 2019 ते ऑक्टोबर 2021 पर्यंत पलक्कड आणि मलप्पुरम येथे भाड्याच्या घरात राहिली आणि आपल्या मुलीला देखील ती सोबत घेऊन गेली होती. दरम्यान, आरोपी तरुणाने प्रेयसीच्या मुलीवर वारंवार बलात्कार केला, इतकेच नव्हे तर मुलीच्या आईने सुद्धा तिच्या प्रियकराला बलात्कार करण्यासाठी मदत केली होती. तसेच, अल्पवयीन मुलीला दारू पिण्यासाठी भाग पाडण्यात आल्याचा देखील आरोप आहे.
हे ही वाचा: बहिणीच्या दीराने बरेच महिने ठेवले शारीरिक संबंध! अखेर गर्भवती राहिली अन् रुग्णालयात स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न...
कोर्टाचे आदेश
महिलेने आपल्या मुलीला गप्प राहण्याची धमकी सुद्धा दिली. आरोपी आईने तिच्या मुलीला सांगितलं की, तिच्या मेंदूत एक चीप बसवली असून याबद्दल कुठेही खुलासा केला तर तिला लगेच कळेल. या प्रकरणासंदर्भात, कोर्टाने दंडाची रक्कम मुलीकडे देण्याचे आदेश दिले असून जिल्हा कायदेशीर सेवा प्राधिकरणाला तिला सर्व्हायव्हर असिस्टन्स स्कीम अंतर्गत अतिरिक्त मदत देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
ADVERTISEMENT











