पाणी पित असताना विजेचा झटका बसला, मजूराचा दुर्दैवी मृत्यू! 11 वर्षांच्या मुलीवरुन बापाचं छत्र हरपलं
ट्रान्सफॉर्मर जवळ असलेल्या नळातून पाणी पिताना मजूर म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीला विजेचा झटका लागला आणि यामध्ये त्याला दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पाणी पित असताना विजेचा झटका बसला
विजेच्या झटक्यामुळे मजूराचा दुर्दैवी मृत्यू!
11 वर्षांच्या मुलीवरुन बापाचं छत्र हरपलं
Crime News: ट्रान्सफॉर्मर जवळ असलेल्या नळातून पाणी पिताना मजूर म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीला विजेचा झटका लागला आणि यामध्ये त्याला दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. संबंधित घटना राजस्थानच्या पालीमध्ये असलेल्या एका गावात घडल्याची माहिती आहे. मृताच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, जैतारणच्या फूलमाला परिसरातील रहिवासी असलेला पारस (32) हा मागील 8 ते 10 वर्षांपासून जाडन येथे मजुरीचं काम करत होता.
पाणी पिताना विजेचा झटका लागला अन्...
एके दिवशी, मृत पारस इतर कामगारांसोबत जोधपुर रोडवरील एका ट्रान्सफॉर्मरजवळ असलेल्या असलेल्या नळातून पाणी पिण्यासाठी आणि तिथे हात-पाय धुण्यासाठी गेला होता. तेव्हा, त्याला अचानक विजेचा झटका लागला आणि तो जमिनीवर कोसळला. तिथे उपस्थित असलेले इतर कामगार आणि गावकऱ्यांनी पीडित व्यक्तीला तातडीने बांगड रुग्णालयात नेलं. मात्र, त्यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. त्यानंतर, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवागारात ठेवण्यात आला.
हे ही वाचा: बहिणीच्या दीराने बरेच महिने ठेवले शारीरिक संबंध! अखेर गर्भवती राहिली अन् रुग्णालयात स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न...
गावकऱ्यांचे आरोप
24 नोव्हेंबरपासून ट्रान्सफॉर्मरच्या तारा उघड्या पडल्याचं म्हणत गावकऱ्यांनी डिस्कॉमवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. याबाबत त्यांनी एईएन, जेईएन आणि लाइनमनकडे बऱ्याचदा तक्रार केली, पण त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. याच कारणामुळे, पीडित कामगार पारला विजेचा झटका लागून मृत्यू झाला. याचा निषेध म्हणून, मृतांच्या कुटुंबियांनी आणि गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचून जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केलं.
हे ही वाचा: बार्शी हादरली, स्टोलने गळा आवळला, शरीरावर 17 वार केले; अनैतिक संबंधातून विवाहितेला क्रूरपणे संपवलं
मुलीवरुन वडिलांचं छत्र हरपलं
त्यांनी प्रकरणात दोषी असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची आणि मृताच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. मृताच्या मोठ्या भावाच्या तक्रारीवरून, जाडन डिस्कॉमचे एईएन अजय माथूर, जेईएन विकास कुमार मालवीय, लाइनमन भवानी सिंग, जेठाराम आणि इतर कर्मचाऱ्यांविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आणि प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला. तसेच, कुटुंबियांच्या माहितीनुसार, पारसला 11 वर्षांची मुलगी असून पीडित तरुण मजूरी करून आपली पत्नी आणि मुलीचं पालनपोषण करत होता. डिस्कॉमच्या निष्काळजीपणामुळे पारसचा मृत्यू झाला आणि 11 वर्षांच्या मुलीवरुन वडिलांचं छत्र हरपलं.










