Crime News : मुलाने आपल्या आईला एका पुरुषासोबत पाहिल्याने त्याने आपल्या आईसह अनोळखी पुरुषाची हत्या केली. अवैध संबंधाच्या संशयातून तरुणाने असं कृत्य केलं आहे. हत्येनंतर तरुणाने मृतदेह एका गाडीत भरून पोलीस ठाण्यात नेले होते. पोलिसांसमोर जाऊन घडलेला सर्व प्रकार सांगितला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी नेले, अशातच पोलीस या प्रकरणाचा तपास करतात. ही घटना हरियाणा जिल्ह्यातील सिकंदरपूरमध्ये घडली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : “मुलगा बीडचा आहे, लग्न करू नको..” तरुणाने तिला संपवलं, घराला लॉक लावून त्यानं ट्रेनखाली जीव दिला, घटनेनं पुणे हादरलं
पोटच्या मुलाने आईसह पुरुषाला संपवलं...
या प्रकरणात गुरुवारी रात्री एका तरुणाने त्याच्या आईचा आणि तिच्या कथित प्रियकराची गळा दबून हत्या केली. शुक्रवारी सकाळी मृतदेह गाडीत भरून पोलीस ठाण्यात नेला. तसेच तो स्वत: पोलिसांसमोर सरेंडर झाल्याची घटना आहे. मृतांची ओळख पटली आहे. मृत महिलेचं नाव अंगूरी देवी (वय 50) आणि तिचा कथित प्रियकर लेखचंद (वय 50) अशी मृतांची नावे आहेत.
तरुणाने दिला हत्येचा कबुलीनामा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणाने तिच्या आईला अनेकदा समजावले, पण तिनं ऐकलं नाही. यामुळे आता तरुणाने गुरुवारी रात्री 2 वाजताच्या सुमारास लेखचंद आण नंतर त्याची आई अंगूरी देवी या दोघांचाही गळा दाबून हत्या केली. मुलाने दोघांच्याही हत्येचा कबुलीनामा दिला आहे.
हे ही वाचा : मैत्रिणीच्या वाढदिवसाला गेली अल्पवयीन मुलगी, दोघांमध्ये जागा झाला हैवान, पार्टीतच तिच्यावर नको तेच...
पोलिसांनी सांगितलं की, आरोपीने दोघांमध्ये अवैध प्रेमसंबंध सुरु असल्याने त्याने हे पाऊल उचलल्याचं सांगितलं. नंतर त्याने दोघांचे मृतदेह पोलीस ठाण्यात नेले. दरम्यान, आता पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
ADVERTISEMENT











