आरोपीने घरी बोलावून प्रेयसीच्या नवऱ्याला संपवलं, हॅक्सोब्लेडने मृतदेहाचे तुकडे करून तलावात फेकले

मुंबई तक

• 07:00 AM • 11 Sep 2026

Crime News : अनैतिक प्रेमसंबंधातून बायकोच्या प्रियकराने नवऱ्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नंतर नवऱ्याच्या मृतदेहाचे तुकडे करून तलावात फेकण्यात आल्याची घटना आहे. या घटनेनं परिसरात खळबळ माजली आहे.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

आरोपीने प्रेयसीच्या नवऱ्याला घरी बोलावून संपवलं

point

मृतदेह पोत्यात भरून तलावात फेकला

Crime News : अनैतिक प्रेमसंबंधातून बायकोच्या प्रियकराने नवऱ्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नंतर नवऱ्याच्या मृतदेहाचे तुकडे करून तलावात फेकण्यात आल्याची घटना आहे. या घटनेनं परिसरात खळबळ माजली आहे. संबंधित प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीची दिनेश रायधणभाई ठाकोर (वय 35) अशी ओळख समोर आली, तर मृत व्यक्तीची लख्खुभाई हुंबल (वय 43) अशी ओळख समोर आली. हा प्रकार गुजरातच्या कच्छ येथील अंजारच्या वससामेडी गावातील आहे. या घटनेची माहिती नागरिकांना समजताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : महिलेकडून अश्लील व्हिडिओंची विक्री, एका क्लीपमागे 100 ते 500 रुपये

पतीला पत्नीच्या प्रेमसंबंधाचा होता संशय

वरसामेडी गावातून लख्खुभाई हुंबल हे बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र तपासादरम्यान, पोलिसांनी या खूनाचा छडा लावला. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. 5 सप्टेंबर 2026 रोजी वरसामेडी गावात एका तलावाच्या काठावर दोन पोती आढळून आली होती. तपासांचा तपास सुरू असताना पोत्यात मृतदेहाचे तुकडे आढळून आले होते. ओळख पटल्यानंतर तो मृतदेह लख्खुभाई हुंबल यांचाच असल्याचे समजले. पोलिसांच्या तपासातून उघडकीस आले की, आरोपी दिनेश ठाकोर याचे गेल्या दीड वर्षांपासून मृताच्या पत्नीसोबत प्रेमसंबंध सुरू होते. लख्खुभाईला पत्नीच्या प्रेमसंबंधाचा संशय आला होता. लख्खुभाई आपली कधीही हत्या करेल अशी भीती आरोपीला वाटू लागली होती. 

आरोपीने घरी बोलावून नवऱ्याला संपवलं, मृतदेह पोत्यात भरून तलावात फेकला

हेच डोक्यात ठेवून लख्खुभाईला आरोपीने आपल्या घरी बोलावले आणि लोखंडी सळीने त्यांच्या डोक्यात हल्ला केला. या हल्ल्याच लख्खुभाईचा मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपीने मृतदेहाचे हॅक्सो ब्लेडने दोन तुकडे केले होते, नंतर दोन्ही भाग वेगळे करून प्लास्टिकच्या पिशवीत मृतदेह भरला, नंतर तलावात फेकून दिला. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपीने रस्त्यावरच मोबाइल फेकून दिला होता. 

हे ही वाचा : दारूच्या नशेत सात वर्षांच्या चिमुकलीचा खून, नऊ दिवसानंतर हत्याकांडाचा उलगडा

संबंधित प्रकरणात पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी दिनेश ठाकोरला अटक केली आहे. या प्रकरणाची कायदेशीर कारवाई सुरू ठेवण्यात येणार आहे.