Crime News : उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. एका महिलेचं पूर्वीच्या एका वाहन चालकासोबत प्रेमसंबंध असल्याचं वृत्त होते. त्याच वाहनचालकाचं नाव हनुमान सिंह असे होते. तो राजस्थानचा रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे. तो गेल्या तीन वर्षांपासून तिच्याकडे काम करत होता. पण आता महिलेनं त्याच वाहनचालकावर गंभीर आरोप केले आहेत. वाहनचालक हनुमान सिंहने तिला वाईट वागणूक दिल्याचे वृत्त आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : वासनांध काकीचे पुतण्यासोबत होते शारीरिक संबंध, पण काकासोबत...
नेमकं काय घडलं?
महिलेनं आरोप केला की, तिचा पूर्वीचा वाहन चालकाने तिला ब्लॅकमेल केलं. तिने दावा केला की, त्याने महिलेचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्ड केले आणि नंतर तो तेच व्हिडिओ शेअर करेल अशी त्याने धमकी दिली. तिचं असंही म्हणणं आहे की, तिच्या पूर्वीच्या ड्रायव्हरने तिच्या घरातून चोरी देखील केली होती.
महिलेचे पूर्वीच्या वाहनचालकावर गंभीर आरोप
पीडितेनं दिलेल्या माहितीनुसार, आरोही हा हनुमान सिंग गेल्या वर्षांपासून तिचा ड्रायव्हर म्हणून कार्यरत होता. याच काळात तो तिच्या घरी वारंवार येत होता. तसेच तिने तिच्या आईच्या कर्करोगाच्या उपचारांसाठी 5 लाख रुपयांची उधारी देखील घेतली होती. नंतर त्याने एकेक करून पैसे परत करणार असल्याचं त्याने आश्वासन दिलं होतं, परंतु तो अचानकपणे नोकरी सोडून पळून गेला. जेव्हा तिने तिचे घर तपासले असता, आपल्या घरातील सोन्याच्या वस्तू गायब झाल्याचं दिसून आलं होतं. तिने दिवा केला की, त्यानेच ते सोने गायब केले.
हे ही वाचा : चंद्रपूर महापालिका निवडणूक 2017 मध्ये भाजपचा दणदणीत विजय, तर 2025-26 मध्ये कशी असेल रणनीती?
अश्लील फोटो आणि व्हिडिओ असल्याचा महिलेचा आरोप
महिलेचं म्हणणं आहे की, आरोपी आता तिला फोनवरून ब्लॅकमेल करत होता. त्याने दावा केला की, त्याच्याकडे अश्लील फोटो आणि व्हिडिओ आहेत आणि जर तिने त्याला 5 लाख रुपये दिले नाही तर तो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जाईल. हे ऐकूण तिच्या कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकून गेली. या प्रकरणावरून तिने आपल्या आरोपीविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या संपूर्ण प्रकरणाबाबत पोलीस पुढील तपास करत असल्याचं सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT











