Crime news : एका मुलीसाठी वडिलांचं असणं फार महत्त्वाचं असतं. पण, हेच वडील अनेकदा त्या मुलीसाठी हैवान असतील असं कधीही घडलेलं दिसत नाही. पण असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुलीचे रक्षक मानले जाणारे वडीलच आपल्याच पोटच्या लेकीचे भक्षक बनल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना कर्नाटक जिल्ह्यातील बिरूर येथे घडली आहे. या घटनेनं बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : इन्स्टाग्रामवर मुलीचा मेसेज येताच कळी खुलली, बोलवताच भेटण्यासाठी गेला पण जीवच गेला!
नेमकं काय घडलं?
पीडित मुलगी, तेसच तिची एक अल्पवयीन बहीण काही काळापूर्वी तिच्या आईला गमावून बसली होती. नंतर त्यांनी शिक्षण पूर्ण करण्यासाठी नातेवाईकांचा आधार घेतला आणि आपलं शिक्षण पूर्ण केलं. नंतर तिने पुन्हा आपलं घर गाठलं, त्यानंतर तिला आपल्या वडिलांकडून एक मानसिक आधार मिळेल अशी अपेक्षा होती. पण, त्या निष्पाप मुलीच्या त्या अपेक्षेचा भंग होऊन बसला. तिच्या नराधम बापाने तिला वैश्यव्यवसायाच्या जाळ्यात अडकवलं.
आजी आणि वडिलांनी मिळून लेकीला विकण्याचा कट रचला
डिसेंबर महिन्यात तिचा बाप आपल्या मुलाली आजीच्या घरी घेऊन गेला होता. तेव्हा दोन दिवसानंतर, आजी आणि वडिलांनी मिळून लेकीला विकण्याचा कट रचला होता. मुलीच्या वडिलांना भरत शेट्टी नावाच्या एका व्यक्तीने तिच्या वडिलांना आमिष दाखवले आणि जर तो या व्यवसायात सामील झाल्यास दररोज 5 हजार रुपये मिळतील असे आश्वासन देण्यात आले. वडिलांनी आपल्या मुलीला विकलं.
मुलीला मासिक पाळी आल्याचं तिनं बापाला सांगितलं अन्...
आरोपी वडील भरत शेट्टीसोबत मुलीला मंगळुरुला घेऊन गेला. वाटेत मुलीने तिच्या वडिलांना सांगितलं की, तिला मासिक पाळी येत आहे आणि ती आजारी आहे, परंतु वडील त्यावर ठाम राहिले होते. दुसऱ्याच दिवशी भरत शेट्टीने मुलीला धमकी दिली, तसेच काही पुरुष येतील आणि तिला त्याच्यासोबत लैंगिक संबंध ठेवावं लागेल.
20 ते 45 वयोगटातील चार पुरुषांकडून तिच्यावर आळीपाळीने लैंगिक शोषण
अशातच तिच्यावर 20 ते 45 वयोगटातील चार पुरुषांनी आळीपाळीने लैंगिक शोषण केले होते. जेव्हा मुलीने याबाबत विरोध दर्शवला असता, तिने तिच्या वयाचं कारण देऊन मला सोडून द्यावं अशी विनंती केली होती, तेव्हा आरोपीने तिचं एक अक्षर ऐकलं नाही. नंतर आरोपी भरत शेट्टीला पैसे देऊन त्यांनी पीडितेचे दोन दिवस लैंगिक शोषण केलं.
हे ही वाचा : अशोक चव्हाणांच्या मनात जरा तरी लाज राहिलीय का? देवेंद्र फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्यामुळे हर्षवर्धन सपकाळ संतापले
मुलीने आपलं धाडस दाखवन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, यामुळे पोलीस ठाणे विभागात एकच खळबळ माजली. पोलिसांनी तात्काळपणे कारवाई करत वडील, तिची आजी आणि मुख्य आरोपी भरत शेट्टीसह एकूण 12 जणांच्या मुसक्या आवळल्या. भरत शेट्टी हा दक्षिण भारतात वेश्यव्यवसायाची टोळी चालवतो. त्याच्याविरुद्ध वेश्यव्यवसायाचे अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ADVERTISEMENT











