Crime News: बंगळुरूच्या एका चित्रपटगृहात धक्कादायक घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. एक अल्पवयीन तरुण थिएटरच्या महिला स्वच्छतागृहात लपून तरुणी आणि महिलांचे आक्षेपार्ह व्हिडीओ शूट करत होता. ही गोष्ट कळताच, पीडित महिलांनी चित्रपटगृहात गोंधळ घातला. त्यानंतर, कोणीतरी संबंधित घटनेची माहिती पोलिसांना दिली आणि माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी पोहोचली.
ADVERTISEMENT
थिएटरच्या वॉशरूममध्ये महिलांचे व्हिडीओ शूटिंग...
पीडित महिलांनी पोलिसांकडे तक्रार केली की, संध्या सिनेमा थिएटरच्या महिलांच्या वॉशरूममध्ये एक अल्पवयीन मुलगा व्हिडिओ रेकॉर्ड करत होता. ही बाब लक्षात येताच सिनेमागृहात उपस्थित महिला प्रेक्षकांनी आरोपीला घेरलं आणि मोठा गोंधळ घातला. पीडितांच्या आरोपानुसार, आरोपी तरुणाच्या या घृणास्पद कृत्यामुळे महिलांच्या गोपनीयतेवर आणि प्रतिष्ठेवर प्रश्न उपस्थित राहिले आहेत. घटनेनंतर, थिएटरच्या परिसरात महिलांचं संतप्त वातावरण पाहायला मिळालं. या प्रकरणी, पीडित महिलांनी आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे.
हे ही वाचा: पुणे: "माझ्या वडिलांची प्रकृती गंभीर..." इमर्जन्सी कॉलच्या बहाण्याने डॉक्टरांना बोलवलं अन् आरोपींचं भयंकर कृत्य!
पोलिसांचा तपास
घटनेनंतर, पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला गर्दीतून सुरक्षितरित्या बाहेर काढलं आणि आपल्या ताब्यात घेतलं. त्यानंतर, पोलिसांनी आरोपी तरुण तसेच आणखी एका संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. दोघांनी मिळून संबंधित घटनेची योजना आखली होती का? याचा पोलीस शोध घेण्यासाठी तपास करत आहेत. सध्या, दुसऱ्या संशयिताची भूमिका अद्याप स्पष्ट झाली नसून प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास केला जात आहे.
हे ही वाचा: रवींद्र चव्हाण म्हणाले, लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील, रितेश देशमुखची 3 वाक्यात भावूक प्रतिक्रिया
पीडित महिलांच्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्या मोबाईल फोनचा देखील तपास केला जात आहे. तसेच, त्या मोबाईलमध्ये असलेल्या डेटाची फॉरेन्सिक तपासणी देखील केली जाणार असल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT











