Crime news : उत्तर प्रदेशातील मथुरातील राया पोलीस ठाणे परिसरातील सारस गावात एका तलावाजवळ अमृत नावाच्या व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याचं वृत्त आहे. त्या व्यक्तीच्या मानेवर धारदार शस्त्राने सपासप वार करण्यात आले होते, यामुळे त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. मथुरा पोलिसांनी अमृतच्या हत्येचा तपास करत काही तपशील उघड करण्याचा प्रयत्न केला.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : अमरावती एमआयडीसीत थिनर कारखान्यात मोठा स्फोट, महिला कामगाराचा आगीत होरपळून मृत्यू
काकीचे पुतण्यावर प्रेमसंबंध
अमृतच्या घरी नातेसंबंधांना काळिमा फासणाऱ्या घटना घडू लागल्या होत्या. याचदरम्यान निष्पाप अमृतचा बळी पडल्याचं सांगण्यात येत आहे. अमृतची पत्नी ही पुतण्याच्या प्रेमसंबंधात वेडी झाली होती. काकू आणि पुतण्या हे नाते दोघेही एकमेकांचे विसरून गेले होते. त्याच संबंधामुळे पती अमृतचा अंत झाल्याचं वृत्त समोर आलं.
प्रेमात काकाची अडचण, पुतण्याने कुऱ्हाडीने तोडून केली हत्या
या प्रकरणात पोलिसांनी 24 तासांच्या आतमध्ये अमृत हत्येचा गुन्ह्याचा उलगडा झाला. मृत अमृतचा पुतण्या रोहितने त्याच्या काकांची हत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं. तपासातून समोर आले की, पुतण्याचे अमृतच्या पत्नीसोबत म्हणजे आपल्या काकीसोबत प्रेमसंबंध होते. यामुळे रोहितने त्याच्या काकांचा खून केला. पोलीस सुरेशचंद्र रावत यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृत हा त्यांच्या नातेसंबंधात अडचण ठरत होता. यामुळे त्याने त्याच्या काकावर कुऱ्हाडीने हल्ला करून त्याची हत्या केली.
नात्याला काळीमा
या प्रकरणातील वृत्तानुसार, 22 वर्षीय रोहितचे त्याच्या काकीशी प्रेमसंबंध असल्याचं सांगण्यात येत आहे. तेव्हा पतीने तिला अनेकदा विरोध केला होता आणि रोहितला आपल्या घरी येण्यापासून रोखले होते. यामुळे रोहितचा संताप वाढत गेला आणि त्याने आपल्याच काकीची हत्या केली.
हे ही वाचा : पती परदेशात राबायचा, इकडं मामीचं भाच्यासोबत जुळलं सूत, 3 वर्षाच्या मुलीला टाकून गेली पळून
तपासातून दिसून आले की, 4 जानेवारी रोजी रोहितने आपला काका अमृतला दारू पाजली. तो गावानजीकच्या एका तलावाजवळ घेऊन गेला आणि त्याच्या मानेवर कुऱ्हाडीने हल्ला केला. नंतर त्याने मृतदेह तलावात फेकून दिला. पोलिसांनी रोहितच्या घरातून रक्ताने माखलेले कपडे जप्त केले आणि त्याच्या मुसक्या आवळल्या, नंतर त्याला तुरुंगात पाठवले.
ADVERTISEMENT











