Crime News: महाराष्ट्रातील एक 66 वर्षीय व्यावसायिक समलैंगिक संबंधांच्या नादात आग्र्याला गेला आणि नंतर हे प्रकरण अपहरण आणि पैसे उकळण्यापर्यंत पोहोचल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. पीडित वृद्धाने एका समलैंगिक डेटिंग अॅपद्वारे काही पुरुषांशी मैत्री केली होती. आग्र्यात पोहोचल्यानंतर तो त्यांना भेटला. मात्र, या बदनामीपासून वाचण्यासाठी व्यावसायिकाने अपहरण आणि पैसे लुबाडल्याची खोटी कहाणी रचली. संबंधित प्रकरणाची तक्रार मिळताच, पोलिसांनी याचा तपास सुरू केला आणि काही तासांतच हे प्रकरण उघडकीस आणलं.
ADVERTISEMENT
समलैंगिक संबंधांसाठी व्यावसायिक आग्र्यात पोहोचला अन्...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित व्यावसायिक हा 66 वर्षांचा असून महाराष्ट्रात त्याचा कपड्यांचा व्यवसाय आहे. त्या वृद्धाने गे-डेटिंग अॅप वापरायला सुरूवात केली आणि त्या माध्यमातून त्याने काही पुरुषांशी मैत्री केली. या अॅपच्या माध्यमातून पुरुषांशी संपर्कात आल्यानंतर, त्यांच्यातील मैत्री ही समलैंगिक संबंधांपर्यंत पोहोचली. त्यानंतर, त्यांनी भेटण्याची योजना आखली आणि आग्र्यात भेटण्याचं ठरवण्यात आलं. समलैंगिक संबंधांच्या नादात व्यावसायिक आग्र्यात पोहोचला. नंतर, शहरातील दरेसी परिसरातील हॉटेलमध्ये रूम बुक करण्यात आली. तो व्यावसायिक त्या पुरूषांसोबत बाहेर फिरण्यासाठी गेला आणि इथेच या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं. या घटनेशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलं आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये व्यावसायिक कोणत्याही दबावाखाली न येता स्वत:च्या इच्छेने हॉटेलमधून बाहेर पडताना आणि कारमध्ये बसून आग्राहून हाथरसला निघताना दिसत आहे. मात्र, हाथरसला पोहोचताच पैशांच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला आणि हा वाद इतका टोकाला पोहोचला की त्या व्यावसायिकाकडून 1.20 लाख रुपये बँक खात्यात ट्रान्सफर करण्यात आले. इतकेच नव्हे तर, त्या वृद्धाची अंगठी आणि मोबाईल फोन सुद्धा घेण्यात आले. भीती, बदनामी आणि प्रकरण त्याच्या कुटुंबापर्यंत पोहोचण्याची शक्यता, या सर्वांमुळे पीडित वृद्धाला चुकीचा निर्णय घेण्यास भाग पाडलं. तो थेट आग्र्यात परतला आणि रात्री उशिरा एत्माद्दौला पोलिस ठाण्यात पोहोचला.
हे ही वाचा: महाचावडी: '20 वर्षांचं भांडण सोडून जर मी एकत्र येऊ शकतो तर...', चावडीवर राज ठाकरे स्पष्टच बोलले!
पोलीस स्टेशनमध्ये पीडित वृद्धाने जे काही सांगितलं, त्यामुळे पोलिसांना सुद्धा मोठा धक्का बसला. काही अज्ञात लोकांनी त्याचं अपहरण केलं आणि त्याच्याकडून पैसे मिळाल्यानंतर, त्याला सोडून दिल्याचा दावा त्या वृद्धाने केला. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन डीसीपींच्या सूचनेच्या आधारे, पोलिसांची पथके तयार करण्यात आली आणि तपासादरम्यान, सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल्स आणि बँक ट्रान्झेक्शनवरून हे स्पष्ट झालं की कोणतंही अपहरण किंवा पीडित व्यक्तीवर बळजबरी करण्यात आली नव्हती. खरं तर, ज्या लोकांवर त्याने आरोप केले होते, त्याच लोकांसोबत तक्रारदार फिरण्यासाठी गेला होता.
हे ही वाचा: 'अंबरनाथमध्ये आम्ही शिंदेंसोबतच जायला हवं होतं, पण...', काँग्रेससोबतच्या युतीवर CM फडणवीसांचं मोठं विधान
हे सत्य उघडकीस आल्यानंतर, तक्रारदार वृद्धाची कठोर चौकशी करण्यात आली आणि त्याने त्याचा गुन्हा कबूल केला. त्या व्यावसायिकाने मोबाईल अॅपद्वारे काही पुरुषांशी मैत्री केली होती आणि त्या मैत्रीचं समलैंगिक संबंधात रूपांतर झालं. खरं तर, हे अपहरण नसून समलैंगिक संबंध, वाद आणि बदनामीच्या भितीने रचलेली ही खोटी कहाणी होती. पोलिसांनी तातडीने कारवाई करत या प्रकरणात सहभागी असलेल्या व्यावसायिकासह पाच लोकांना ताब्यात घेतलं आहे. तसेच, ज्या बँक खात्यात 1.20 लाख रूपये ट्रान्सफर झाले, ते सुद्धा फ्रीझ करण्यात आलं आहे. आता, सर्व आरोपींविरुद्ध कारवाई केली जात असल्याची माहिती आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली की, तपासात अपहरण किंवा फसवणूक झाल्याचं आढळलं नाही. या प्रकरणात वैयक्तिक संबंध तसेच वादाचा समावेश होता, जो लपवून ठेवण्यात आला होता आणि त्यामुळेच पोलिसांची दिशाभूल करण्यात आली होती.
ADVERTISEMENT











