Crime News : दिल्लीतील लक्ष्मी नगर परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. एका तरुणाने आपल्या कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या करून नंतर थेट पोलीस ठाण्यात जाऊन सरेंडर झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या घटनेत आरोपीने स्वतःच्या आई, बहिणी आणि अल्पवयीन भावाचा जीव घेतला. घटनेनंतर परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.ही घटना लक्ष्मी नगरमधील मंगल बाजार परिसरातील एका अरुंद गल्लीत घडली. आश्चर्याची बाब म्हणजे, इतका मोठा प्रकार घडूनही शेजाऱ्यांना याची कुणकुणही लागली नाही.
ADVERTISEMENT
अधिकची माहिती अशी की, सकाळच्या सुमारास अचानक पोलीस घटनास्थळी पोहोचले, तेव्हा परिसरातील नागरिकांना या भीषण हत्याकांडाची माहिती मिळाली. पोलिसांनी तत्काळ घरात प्रवेश करून पाहणी केली असता, घरात आई, मुलगी आणि मुलाचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला. या प्रकरणातील आरोपी तरुणाचे नाव यशवीर सिंह असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मृतांची ओळख कविता सिंह (वय 46), मेघना सिंह (वय 24) आणि मुकुल सिंह (वय 14) अशी झाली आहे. यशवीर सिंहने हत्या केल्यानंतर स्वतः लक्ष्मी नगर पोलीस ठाण्यात हजर होऊन आपण आई, बहिण आणि भावाचा खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने त्याला ताब्यात घेत घटनास्थळी धाव घेतली.
हेही वाचा : मुंबईत खळबळ, प्रचार सुरु असताना एकनाथ शिंदेंच्या उमेदवाराच्या पोटात चाकू खुपसला
घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांसह फॉरेन्सिक पथकही घटनास्थळी दाखल झाले. घरातून विविध पुरावे गोळा करण्यात आले असून, तीनही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. प्राथमिक तपासात घरगुती वादातून ही घटना घडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे, मात्र नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
शेजारी राहणारे महेश शर्मा यांनी सांगितले की, पोलिसांनी घटनास्थळी आल्यानंतरच आम्हाला या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी सांगितले की, या कुटुंबातील सर्व सदस्य शांत स्वभावाचे होते आणि दररोज मंदिरात जात असत. मात्र, घटनेच्या दिवशी कोणीही मंदिरात गेल्याचे दिसले नाही. त्यामुळे शेजाऱ्यांनाही काहीतरी अनर्थ घडल्याचा संशय आला नव्हता. दरम्यान, पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी यशवीर सिंह आर्थिक अडचणींमुळे तणावात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आर्थिक तंगी, कौटुंबिक तणाव किंवा अन्य कोणते मानसिक कारण या हत्यामागे आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. आरोपीची सखोल चौकशी सुरू असून, त्याच्या जबाबानंतरच या तिहेरी हत्याकांडामागील खरी कारणे समोर येणार आहेत. या घटनेमुळे लक्ष्मी नगर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, दिल्लीतील कायदा व सुव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पोलिसांकडून तपास वेगाने सुरू असून, लवकरच या प्रकरणातील सर्व बाबी उघड होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
मोठी बातमी : संजय राऊत समोर दिसले, एकनाथ शिंदेंचा नमस्कार,दोघांमध्ये काय चर्चा झाली? पाहा व्हिडीओ
ADVERTISEMENT











