Crime News : एका अल्पवयीन मुलीवर दोन पुरुषांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एवढंच नाहीतर तिचे सर्व व्हिडिओ रेकॉर्ड केले आणि नंतर तेच व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देखील देण्यात आली होती. तसेच नंतर 5 लाखांची देखील मागणी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. घटना उत्तर प्रदेशातील झांशीमध्ये घडली आहे. या घटनेची माहिती पीटीआय या वृत्तमाध्यमाने दिली आहे. या प्रकरणात वैभव पतसारिया (वय 19) आणि विशाल पतसारिया (वय 21) अशी आरोपींची नावे आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : पुण्यात ‘पुनीत बालन क्रिकेट अकॅडमी’ची घोषणा, BCCI स्टॅंडर्डसह देशातील सर्वात मोठा प्रायव्हेट क्रिकेट सेटअप सुरू
याच प्रकरणात शनिवारी गरोठा परिसरात गोळीबार करण्यात आला होता. याच गोळीबारानंतर पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींपैकी एकाला गोळी लागली आणि त्याला वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे.
आरोपींकडून मुलीवर लैंगिक अत्याचार
या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी मुलीवर लैंगिक अत्याचार केले. नंतर महिलेला बेदम मारहाण करत व्हिडिओ देखील रेकॉर्ड केला. तसेच 5 लाख रुपयांची मागणी देखील करण्यात आली होती. जर तिने पैसे न दिल्यास तिचे सर्व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देखील देण्यात आली.
हे ही वाचा : अनिता माहेरहून सासरी आली, थोड्या वेळात निघून गेली,...अन् दुसऱ्या दिवशी घरात पती अन् सासूचा मृतदेह सापडला
आरोपी आणि पोलिसांमध्ये चकमक
आरोपींचा तपास करताना माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथकांनी त्याचा माग काढला आणि त्यांना घेराव घातला. या प्रकरणात पोलिसांनी सांगितलं की, आरोपींनी पोलिसांवर गोळीबार केला, ज्यात प्रत्युत्तरात पोलिसांनीही गोळीबार केला. या प्रकरणात आता दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून बेकायदेशीर शस्त्रे देखील जप्त करण्यात आल्याचे वृत्त आहे.
ADVERTISEMENT











