आधी मिठी मारतो नंतर Kiss करतो.. सीरियल किसरचा धुमाकूळ, महिलांमध्ये प्रचंड भीती!

मुंबई तक

11 Jun 2025 (अपडेटेड: 12 Jun 2025, 12:15 AM)

crime news : बंगळुरूतील एका पार्कमध्ये दोन महिलांवर विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका अज्ञात व्यक्तीने पार्कमध्ये फेऱ्या मारणाऱ्या दोन महिलांना आधी मिठी मारत किस घेतला. या घटनेनं महिलांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

crime news two women were hugged and kissed by an unknown person in Bengaluru

crime news two women were hugged and kissed by an unknown person in Bengaluru

Google CTA

बातम्या हायलाइट

point

बंगळुरूत दोन महिलांवर पार्कमध्ये विनयभंग

point

महिलांमध्ये प्रचंड भीती वातावरण

Crime News : देशातील महिलांवरील विनयभंगाच्या अनेक घटना घडताना दिसतात. अशीच एक घटना आता बंगळुरूत घडली आहे. एका पुरुषाने एका उद्ययानात फिरणाऱ्या दोन महिलांचा विनयभंग केल्याची मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. त्याने आधी महिलेला मिठी मारली, नंतर त्या महिलांचं चुंबन घेतलं आणि घटनास्थळावरुन पळ काढला. या घटनेदरम्यान, महिलांनी आरडाओरड केली असता, ओरडून काहीही होणार नाही, असे तो म्हणाला. या घटनेनं महिलांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, पोलिसांनी संबंधित प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. ही घटना 6 जून रोजी पुलकेशीनगर पोलीस ठाणे परिसरात घडली आहे. 

हे वाचलं का?

हेही वाचा : सोनमने मारेकऱ्यांना केला इशारा अन् त्या सेकंदभरात राजाचा खेळ खल्लास, घटनास्थळी...

नेमकं काय घडलं? 

बंगळुरूतील पुलकेशीनगर पोलीस ठाणे परिसरातील टाउनमधील मिल्टन पार्कमध्ये एका पुरूषाने दोन महिलांचा विनयभंग केला. मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला एक महिला आपल्या कुटुंबासोबत फेऱ्या मारताना आरोपी नराधम महिलेजवळ आला आणि तिच्याशी गैरवर्तन करु लागला. 

त्यानंतर त्याने त्याच पार्कमधील दुसऱ्या महिलेसोबत वाईट वर्तन केलं असता, त्या महिलेनं त्याला विरोध केला आणि तरुणाने तिला धमकी दिली. घडलेला प्रकार कोणालाही सांगितला तरी काहीही फरक पडणार नसल्याचं नराधम म्हणाला.

या संपूर्ण घटनेमध्ये रात्री पुलकेशीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाबाबत पोलिसांनी सांगितले की, पार्कमध्ये फिरणाऱ्या दोन महिलांचे जबरदस्ती चुंबन घेत विनयभंग करण्यात आला.

हेही वाचा : महिला डॉक्टरचे AI जनरेटेड अश्लील व्हिडिओ, नेमकं हॉस्पिटलमध्ये घडलं काय?

आरोपीवर गुन्हा दाखल

नराधमाच्या कृत्याने बीएनएस 74 आणि 75 अंतर्गत एफआरआय दाखल करण्यात आला. तसेच पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. आरोपी नराधम्याच्या लवकरच मुसक्या आवळण्यात येतील, असा दावा पोलिसांनी केला आहे.