'जर कोणाला सांगितलं तर फोटो आणि व्हिडिओ व्हायरल...' महिला शिक्षिकेला तरुणांनी फ्लॅटवर नेलं अन्...

मुंबई तक

22 Jun 2025 (अपडेटेड: 22 Jun 2025, 08:24 PM)

crime news : लातूरमध्ये एका शिक्षिकेचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शिक्षिका ही घटस्फोटीत असून दोन तरुणांनी तिचे लैंगिक शोषण केलं. लैंगिक शोषण करणारे नराधम संतोष गर्जे आणि यशवंत जगताप यांच्यावर विनयभंगाचा आरोप करण्यात आला आहे.

crime news

crime news

Google CTA

बातम्या हायलाइट

point

महिला शिक्षिकेचं लैंगिक शोषण

point

लातूर हादरल

Latur Crime News : लातूरमध्ये एका शिक्षिकेचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शिक्षिका ही घटस्फोटीत असून दोन तरुणांनी तिचे लैंगिक शोषण केलं. लैंगिक शोषण करणारे नराधम संतोष गर्जे आणि यशवंत जगताप या दोघांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनं लातूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. 

हे वाचलं का?

हेही वाचा : विरारमध्ये बस चालकाकडून हिट अँड रन, अपघातात रिक्षाचा चेंदामेंदा अन् प्रवासी जागीच ठार

महिला शिक्षिकेचा घटस्फोट अन् तरुणांनी संधी साधत...

पीडित महिला ही शिक्षिका असून तिचा काही वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. दरम्यान, संतोष गर्जे आणि यशवंत जगताप नावाच्या दोन तरुणांनी महिला शिक्षिकेला एका फ्लॅटवर नेले आणि तिचं लैंगिक शोषण केलं आहे. या प्रकरणात आरोपी संतोष गर्जेनं महिलेचा विनयभंग केल्यानंतर धमकावले. तो म्हणाला की, जर कोणाला काही सांगितलंस तर तुझे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करेन.  

विनयभंगाच गुन्हा दाखल

या प्रकरणात विवेकानंद पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. संतोष गर्जेवर बलात्काराचा, तर यशवंत जगताप याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. विवेकानंद चौक पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घालत तपास सुरु केला. पोलिसांनी आरोपीला अटक करू असे आश्वासन दिले आहे. 

हेही वाचा : महिलेला घरी जाण्यासाठी पतीनं बुक केली कॅब, ड्रायव्हरने दोन प्रवाशांना गाडीत घेतलं, मुंबईत 'त्या' रात्री महिलेसोबत..

या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. समाजात महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनेनं चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अशा घटना दररोज घडत आहेत. या घटना दररोज होऊ नये म्हणून नागरिकांनी आरोपींना लवकरात अटक करा अशी मागणी केली आहे.