महिलेला घरी जाण्यासाठी पतीनं बुक केली कॅब, ड्रायव्हरने दोन प्रवाशांना गाडीत घेतलं, मुंबईत 'त्या' रात्री महिलेसोबत..
Mumbai Crime news : मुंबईतील उबर कॅबमधून प्रवास करताना एका विमान कंपनीच्या महिला पायलटने लैंगिक छळाचा आरोप केला आहे. त्यानंतर पोलिसांनी कॅब चालक आणि इतर दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरूवारी रात्री 11.15 च्या सुमारास ही घटना घडली
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

उबर कॅबमधून प्रवास करताना महिला पायलटवर लैंगिक छळाचा प्रयत्न

घटनेनं एकच खळबळ
Mumbai Crime news : मुंबई येथे एका उबर कॅबमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशावर विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली. या प्रकरणात पोलिसांनी कॅब चालक आणि इतर दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुरूवारी रात्री 11.15 च्या सुमारास मुंबई येथे ही घटना घडली आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा : पत्नीच्या चारित्र्यावर संशय अन् हत्या, मृतदेह पलंगाखाली, सातारा हादरला..
नेमकं काय घडलं?
28 वर्षीय पीडित महिला दक्षिण मुंबईहून घाटकोपरला तिच्या राहत्या घरी येत होती. त्याचवेळी तिच्यासोबत कॅबमध्ये लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा आरोप तिनं केला आहे. तिचा पती नौदल अधिकारी असून ती पायलट म्हणून कार्यरत आहे. गुरूवारी रात्रीच्या सुमारास ती एका रेस्टॉरंटमधून जेवन करून येत होती, तेव्हा तिच्या पतीने तिच्यासाठी उबर बुक केली.
दरम्यान, महिलेनं दिलेल्या माहितीनुसार, 25 मिनिटांनंतर कॅब ड्रायव्हरने रस्ता बदलला आणि दोघांना कॅबमध्ये बसण्यास सांगितले. त्या दोघांपैकी एकजण हा महिलेच्या बाजूला बसला होता. त्यावेळी त्याने महिलेच्या शरीराला चुकीचा स्पर्श केला.
यावेळी महिलेनं आरडाओरड केली असता, तिला ओरडू नको अशी धमकीच दिली. ड्रायव्हरने याकडे दुर्लक्ष केलं आणि तो गाडी चालवू लागला होता. थोडंफार अंतर कापल्यानंतर रस्त्यावर पोलीस होते, अशावेळी ड्रायव्हरने दोघांना आपल्या कॅबमधून उतरवले आणि ते दोघेजण पळून गेले.
हेही वाचा : पोहायला जातो सांगून गेले अन् परतलेच नाही... 17 तासानंतर सापडले दोन्ही भावांचे मृतदेह
या प्रकरणात महिलेनं ड्रायव्हरला विचारले की, तुम्ही त्या दोघांना गाडीत का बसवले होते? त्यावर ड्रायव्हर काहीही न बोलता मूग गिळून गप्पा होता.