बायकोने नवऱ्याच्या गुप्तांगावर मारली लाथ, तीन महिन्यांपूर्वी झालं होतं ऑपरेशन, जागीच मृत्यू

Crime News : बंगाली वसाहतीत कौटुंबिक वादातून पत्नीने पतीची हत्या केली. पत्नीचा आरोप आहे की, पतीचे दुसऱ्याच महिलेशी प्रेमसंबंध होते. यामुळे दोघांमध्ये सतत वाद व्हायचे. दोघांमधील वाद इतका विकोपाला गेला की, पत्नीने आपल्या नवऱ्याच्या प्रायव्हेट पार्टवर जोरदार हल्ला केला.

crime news

crime news

मुंबई तक

26 Apr 2026 (अपडेटेड: 26 Apr 2026, 03:03 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

नवरा-बायकोमध्ये कौटुंबिक कलह

point

तीन महिन्यांपूर्वी झाले होते हार्नियाचे ऑपरेशन

Crime News : बिहारच्या लौरिया येथील गोबरैला बंगाली वसाहतीत कौटुंबिक वादातून पत्नीने पतीची हत्या केली. पत्नीचा आरोप आहे की, पतीचे दुसऱ्याच महिलेशी प्रेमसंबंध होते. यामुळे दोघांमध्ये सतत वाद व्हायचे. दोघांमधील वाद इतका विकोपाला गेला की, पत्नीने आपल्या नवऱ्याच्या प्रायव्हेट पार्टवर जोरदार हल्ला केला. अशातच नवऱ्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : शौचालयास बसलेल्या नणंद-भावजयीवर सहा नराधमांकडून सामूहिक अत्याचार, क्रूरतेची ओलांडली परिसिमा

नवरा-बायकोमध्ये कौटुंबिक कलह

मृत नवऱ्याची ओळख अमुल चंद्र नमोदास (वय 35) अशी झाली असता, हे प्रकरण गोबरोरा पंचायत मटियारिया बंगाली वसाहतीतील आहे. अमुल आणि पत्नी नीलम देवी यांना सात वर्षीय मुलगा आणि एक चार वर्षांची मुलगी आहे. कुटुंबियांच्या माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये अनेकदा वाद व्हायचे. मागील काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये वाद झाला आणि मारहाण देखील झाली, ज्यात पत्नीच्या माहेरच्या मंडळींनी प्रकरण समजून घेतले.  

तीन महिन्यांपूर्वी झाले होते हार्नियाचे ऑपरेशन

सांगण्यात येतेय की, मृत नवऱ्याच्या डोळ्याला कमी दिसत होते आणि जवळ तीन महिन्यांपूर्वी त्याचे हार्नियाचे ऑपरेशन झाले होते. या घटनेची माहिती पोलिसांना समजली असता, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. दरम्यान, चौकशी सुरु असताना पत्नी नीलम देवीने गुन्ह्याचा कबुलीनामा दिला, अशातच पोलिसांनी आरोपीला अटक करत पुढील कारवाई करण्यास सुरुवात केली. या घटनेनं परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.  

हे ही वाचा : भीषण अपघातात जुन्नरच्या नायब तहसीलदारांचा मृत्यू, हायवा आणि कारची समोरासमोर धडक

दरम्यान, गेल्या काही वर्षांमध्ये कौटुंबिक कलहांमुळे नातेसंबंधांमध्ये ताटातुट होऊ लगाली आहे. यामुळे घटस्फोटाच्या प्रमाणात देखील वाढ झाली आहे. घडलेली ही घटना नवरा-बायकोच्या नात्याला कलंकीत करणारी घटना आहे. अशातच पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असल्याची माहिती आहे.