काका अशी ओळख सांगून, 6 वर्षीय मुलीला घरात फसवून नेले नंतर नको तेच... लाज आणणारी घटना

मुंबई तक

25 Apr 2026 (अपडेटेड: 25 Apr 2026, 02:25 PM)

Crime News : काका म्हणवून घेणाऱ्या व्यक्तीने 6 वर्षाच्या चिमुरडीवर अमानुष अत्याचार केले. या घटनेनंतर, कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली. या घटनेनंतर, मुलगी रडू लागली आणि तिने आपल्या कुटुंबाला घडलेला एकूण प्रकार सांगितला.

crime news

crime news

Google CTA

बातम्या हायलाइट

point

मुलीचा काका म्हणवून पीडितेवर केले लैंगिक अत्याचार 

point

मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Crime News : मध्य प्रदेशातील ग्वालियर शहरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. काका म्हणवून घेणाऱ्या व्यक्तीने 6 वर्षाच्या चिमुरडीवर अमानुष अत्याचार केले. या घटनेनंतर, कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली. या घटनेनंतर, मुलगी रडू लागली आणि तिने आपल्या कुटुंबाला घडलेला एकूण प्रकार सांगितला. हे ऐकून कुटुंब पूर्णपणे हादरून गेल्याचे सांगण्यात येते. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : सुनेत्रा पवारांचा विजय निश्चित? राहुरीत काय होणार? बघा, काय सांगतो एक्झिट पोल..

कसलाही वेळ न दवडता संतप्त आणि व्यथित कुटुंबाने तिला तात्काळपणे ग्वाल्हेरमधील पिछोर पोलीस ठाण्याच नेले, त्यांनी आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. कुटुंबीयांच्या तक्रारीच्या आधारे, आरोपी राहुल कुशवाहा याच्याविरुद्ध एफआरआय नोंदवण्यात आला आणि त्याचा शोध सुरु करण्यात आला. पोलीस पथकाने तत्परता आणि दक्षता दाखवत, आरोपी राहुल कुशवाहाला काही वेळातच अटक केली.  

मुलीचा काका म्हणवून पीडितेवर केले लैंगिक अत्याचार 

घडलेल्या घटनेनुसार, पीडित मुलगी ही घराबाहेर खेळत होती, त्याचवेळी राहुल कुशवाहा नावाचा शेजारी स्वत:ला मुलीचा काका म्हणवून घेत होता, तिला आपल्या घरी बोलावले. त्याने तिला घरात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला. पोलिसांनी सध्या आरोपीला अटक केली असून संबंधित प्रकरणात पुढील कायदेशीर कारवाई सुरु आहे. 

हे ही वाचा : बुध आणि शुक्र ग्रह श्रीमंत बनवतील! मे महिन्याच्या अखेरीपासून 'या' राशींसाठी चांगले दिवस सुरू होतील

मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

या मन हेलावून टाकणाऱ्या घटनेनं पुन्हा एकचा विचार करण्यास भाग पडले, की ओळखीच्या लोकांवरही आंधळेपणाने विश्वास ठेवणे किती धोकादायक असू शकते. देशभरात अशा घटना घडू लागलेल्या आहेत, या घटनेनं मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महिला किंवा मुली केवळ समाजातच नाही, तर आता घरात देखील सुरक्षित आहेत की, नाही असा सवाल केला जात आहे.