70 वर्षीय वृद्धाने 26 वर्षीय दिव्यांग तरुणीवर केला बलात्कार, बायकोला दूध आणायला पाठवलं अन्..

एका 70 वर्षीय वृद्धाने 26 वर्षीय नातेवाईक दिव्यांग महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही पीडित महिला मानसिकदृष्ट्या दिव्यांग आहे. या आरोपी वृद्धाने नियोजनबद्ध पद्धतीने हा प्रकार केल्याची माहिती समोर आली आहे.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 08:49 AM • 26 Apr 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

70 वर्षीय वृद्धाने 26 वर्षीय दिव्यांग तरुणीवर केला बलात्कार,

point

बायकोला दूध आणायला पाठवलं अन्..

Crime News : गुजरातच्या महिसागर जिल्ह्यातील लुणावाडा शहरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका 70 वर्षीय वृद्धाने आपल्याच 26 वर्षीय नातेवाईक दिव्यांग महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही पीडित महिला मानसिकदृष्ट्या दिव्यांग असून, याप्रकरणी लुणावाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

हे वाचलं का?

बायकोला दूध आणायला घराबाहेर पाठवले आणि..

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा पीडित महिलेचा शेजारी आणि दूरचा नातेवाईक आहे. घटनेच्या दिवशी पीडित महिला घरी एकटी असल्याचे पाहून आरोपीने तिला आमिष दाखवून आपल्या घरी बोलावून घेतले. गुन्हा करण्यापूर्वी आरोपीने अत्यंत नियोजित पद्धतीने आपल्या बायकोला दूध आणण्यासाठी घराबाहेर पाठवले होते. त्यानंतर घराचा दरवाजा आतून बंद करून त्याने या असहाय्य महिलेवर लैंगिक अत्याचार केला, असे पोलीस तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

हे ही वाचा : 16 वर्षीय मुलाचं पोट फाडून गळा चिरला, भर लग्नसोहळ्यात रक्ताचा सडा, मृतदेह शेतात फेकला अन्... भयंकर कांड

आईला सांगितला घडलेला प्रकार

या धक्कादायक प्रसंगानंतर पीडित महिलेने आपल्या आईला घडलेला सर्व प्रकार सांगितला. मुलीसोबत घडलेला प्रकार ऐकल्यानंतर कुटुंबीयांनी तत्काळ लुणावाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार नोंदवली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने कारवाई करत 70 वर्षीय आरोपीला अटक केली. सध्या न्यायालयाने आरोपीची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

हे ही वाचा : पुण्याची गोष्ट : शिरुरमध्ये भररस्त्यात महिलेची प्रसूती, डॉक्टर अन् नगरसेविका झाल्या देवदूत

पीडितेला न्याय मिळणार का?

स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात लैंगिक अत्याचार आणि दिव्यांग व्यक्तींवरील अत्याचाराशी संबंधित विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पथक सध्या पुरावे गोळा करत असून पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. या घटनेने स्थानिक समाजात चिंतेचे वातावरण पसरले असून महिला आणि दिव्यांगांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.