महिलेनं आधी नवऱ्याला सोडलं, नंतर दुसरा धरला अन् थेट मुलालाच...आई नाही ही तर कसाई

मुंबई तक

17 Jun 2025 (अपडेटेड: 17 Jun 2025, 10:25 PM)

Crime News : उत्तर प्रदेशातील जौनापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका पाच वर्षांच्या निष्पाप मुलाची त्याच्याच आईनं आणि सावत्र वडिलांनी गळा दाबत हत्या केली आहे. ही घटना जौनपूर जिल्ह्यातील मिरगंज पोलीस ठाणे परिसरात घडली आहे.

crime news woman kills her own son in jaunpur district at uttar pradesh

crime news woman kills her own son in jaunpur district at uttar pradesh

Google CTA

बातम्या हायलाइट

point

पाच वर्षांच्या निष्पाप मुलाची आईनं केली हत्या

point

आई नाही,तर कसाई

Crime News : उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना घडली आहे. एका पाच वर्षांच्या निष्पाप मुलाची त्याच्याच आईनं आणि सावत्र वडिलांनी गळा दाबत हत्या केली आहे. ही घटना जौनपूर जिल्ह्यातील मिरगंज पोलीस ठाणे क्षेत्रात घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाचे वडील अझीझ यांनी आपल्या घटस्फोटीत बायको रेश्मा आणि तिचा दुसरा पती आतिकवर मुलाचा खून केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे. 

हे वाचलं का?

हेही वाचा : Viral News : गर्लफ्रेंड सरणावर असताना बॉयफ्रेंडने केलं 'असं' काही.. झाले सगळेच हैराण!

पोलिसांकडून धक्कादायक खुलासे

अतिरिक्त पोलीस अधीक्षक आतिश कुमार सिंह यांनी या प्रकरणात लक्ष्य घालत माहिती दिली आहे. ते म्हणाले की, रेश्माचे पहिले लग्न हे प्रतापगड जिल्ह्यातील चिताईपूर येथील रहिवासी अझीझसोबत झालं होतं. मात्र, त्यांच्यातील वैवाहिक कलहामुळे दोघांचाही घटस्फोट झाला. त्यानंतर रेश्माने जगदीशपूरच्या आतिश नावाच्या तरुणाशी विवाह केल्याची माहिती सिंह यांनी दिली. दरम्यान रेश्मा आणि अतिक हे दोघेही गोधना येथील भाड्याच्या घरात राहत होते.

सोमवारी सकाळी रेश्मा आपल्या मुलाचा मृतदेह हा बारवा येथील तिच्या माहेरच्या घरी घेऊन आली होती. मुलाच्या मृत्यूची बातमी समजताच अझीझने पोलिसांना कळवले. अशावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि एका रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. 

पोलिसांनी सांगितलं की, मुलाच्या मानेवर जखमांच्या खुणा दिसून येत आहेत. यामुळे कोणीतरी गळा दाबून खून तर केला नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत असून संशय व्यक्त केला जात आहे. अशातच आता अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी सांगितलं की, चौकशीदरम्यान, रेश्माने या खूनाबाबत मोठा खुलासा केला. 

हेही वाचा : मुंबईला येणाऱ्या एअर इंडिया विमानात बिघाड, डाव्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यानंतर कोलकातामध्येच...

तिने अतिकसोबत मिळून मुलाचा गळा आवळून त्याचा खून केला असल्याचे रेश्माने कबूल केलं. रेश्माने याबाबत पोलिसांनी सांगितलं की, अझीझ मुलाला आपल्याकडे घेऊन जाणार होता. मात्र, मुलगा घेऊन जाण्यास विरोध केल्याने त्यांनी मिळून हे हैवानी कृत्य केलं आहे.