Viral News : गर्लफ्रेंड सरणावर असताना बॉयफ्रेंडने केलं 'असं' काही.. झाले सगळेच हैराण!

मुंबई तक

Viral News : उत्तर प्रदेशातील महाराजगंजमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रियकराने आणि प्रियसीसोबत सात जन्म एकत्र राहण्याची शपथ घेतली होती. मात्र, त्या दोघांच्या संसाराला सुरूवात होण्याआधीच ब्रेक लागला आहे. प्रेयसीच्या मृत्यूनंतर प्रियकराने तिच्या भांगेत कुंकू भरलं आहे.

ADVERTISEMENT

viral news
viral news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

प्रियकराने आणि प्रियसीसोबत सात जन्म एकत्र राहण्याची घेतली शपथ

point

संसाराला सुरूवात होण्याआधीच ब्रेक

Viral News : उत्तर प्रदेशातील महाराजगंजमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रियकराने आणि प्रियसीसोबत सात जन्म एकत्र राहण्याची शपथ घेतली होती. मात्र, त्या दोघांच्या संसाराला सुरूवात होण्याआधीच ब्रेक लागला आहे. प्रेयसीच्या मृत्यूनंतर प्रियकराने तिच्या भांगेत कुंकू भरलं आहे. एखाद्या सिनेमालाही लाजवेल अशी ही घटना घडली आहे. त्याने आपल्या प्रेयसीला कधीही साथ सोडणार नसल्याचं वचन दिलं. तिच्या मृत्यूनंतर तरुण प्रियकर आपल्या वचनाला सार्थ ठरला आहे. 

हेही वाचा : 'मी या पुढे कधीही एअर इंडियाच्या विमानात बसणार नाही', कोणता क्रिकेटरला भरलीय धडकी?

प्रियकर तरुणाचे नाव सन्नी असे असून त्याचं प्रियंका नावाच्या एका तरुणीवर जीवापाड प्रेम होतं. आपल्या प्रेयसीचा मृत्यू झाल्यानंतर सन्नीने तिच्या केसातील भांगेत कुंकू लावलं आणि त्यानं तिच्यासोबत लग्न केलं. या लग्नाची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. प्रेमाची व्याख्या सांगणारी ही घटना आहे. 

दोघांनीही शेवटपर्यंत एकत्र राहण्याची घेतली शपथ

महाराजगंजच्या निचलौल ठाणे क्षेत्रातील सन्नी मद्देशियाने भाडेतत्वावर एक दुकान घेतलं होतं. दुकान मालकाची मुलगी प्रियंका मुद्देशियाची सन्नीसोबत अनेकदा भेट झाली होती. त्यानंतर दोघांची मैत्री झाली. नंतर मैत्रीचं नात्यात रुपांतर झालं. प्रियंकालाही सन्नी आवडू लागला होता. सुरूवातीला कुटुंबियांनी दोघांच्याही लग्नाला विरोध केला. पण दोघांनीही शेवटपर्यंत एकत्र राहण्याची शपथ घेतली. 

दोघांनीही विवाह करण्याचा निश्चय केला होता. दोघेजण विवाहाची स्वप्न पाहू लागली होती. दोघांनीही भविष्याचा विचार केला. मात्र, अचानकपणे एक दुर्दैवी घटना घडली, ज्यामुळे सर्व काही होत्याचं नव्हतं होऊन बसलं. प्रियंकाने तणावाचा सामना करत आयुष्याला कंटाळून टोकाचं पाऊल उचलंत आत्महत्या केली. या घटनेनं सन्नी पूरता खचून गेला होता. तसेच तिने उचललेल्या पावलामुळे दोघांच्या कुटुंबात शोक व्यक्त केला जात आहे. 

दरम्यान, प्रियंकाच्या मृतदेहाच्या अंतिम संस्काराची तयारी सुरू होती. अशावेळी सन्नीनं प्रियंकाचं घर गाठलं. अंतिम संस्कारासाठी आलेल्या एका गुरूजीने मंगलाष्टिका बोलण्यास सुरूवात केली. तसेच मंत्र वाचण्यास सुरुवात केली. सन्नीने पतीची भूमिका घेत आपल्या होणाऱ्या पत्नीला मुखाग्नी दिली. 

हेही वाचा : मुंबईला येणाऱ्या एअर इंडिया विमानात बिघाड, डाव्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यानंतर कोलकातामध्येच...

दरम्यान, प्रियंकानं आत्महत्या का केली? असा प्रश्न उपस्थित होत होता. पोलिसांनी प्रियंकाचा मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सन्नीच्या प्रेमाची जोरदार चर्चा होत आहे.  

हे वाचलं का?

    follow whatsapp