नवऱ्याला सोडून दिलं; परपुरूषाला केलं जवळ, त्याच पुरूषानं आधी महिलेचे केलं लैंगिक शोषण, नंतर तिच्याच मुलीवर...

मुंबई तक

• 02:20 PM • 03 Jun 2025

Crime News : उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. मडियांवा पोलीस ठाणे पसिरात एका तरुणाने एका महिलेचे लैंगिक शोषण केलं. त्यानंतर पीडित महिलेल्या अल्पवयीन मुलीवरही अत्याचार केलेत.

crime news women leave Her Husband for boy friend uttar pradesh in lucknow story

crime news women leave Her Husband for boy friend uttar pradesh in lucknow story

Google CTA

बातम्या हायलाइट

point

माणुसकीला काळीमा फासणारी घटना आली समोर

point

आधी महिलेवर नंतर तिच्याच अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केलं

Crime News : उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. मडियांवा पोलीस ठाणे पसिरात एका तरुणाने एका महिलेचे लैंगिक शोषण केलं. त्यानंतर महिलेच्या मुलीवरही लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. पीडितेने विरोध करुनही त्याने काहीही ऐकलं नाही उलट पीडितेला धमकी दिली. दरम्यान, ही घटना लखनऊमधील अलीगंज येथे घडली आहे. 

हे वाचलं का?

हेही वाचा : पुरुषांचा स्पर्म काऊंट कमी झालाय? टेन्शन नॉट तरीही व्हाल बाबा, शास्त्रज्ञांनी केलं संशोधन

नेमकं प्रकरण काय? 

या घटनेचा एकूण घटनाक्रम पीडितेनं सांगितला आहे. मऊ येथील पालीगड नरसिंहपूर येथील रहिवासी अनुप सिंग हा महिलेसोबत भाड्याने राहत होता. अनुपने महिलेसोबत गप्पा गोष्टी करत मैत्री केली. पीडित महिलेचा आरोप आहे की, मे 2021 मध्ये अनुपने पीडितेवर जबरदस्ती लैंगिक शोषण केलं. त्यावेळी तिने अनुपच्या या कृत्याला विरोध केला. पीडित महिला गर्भवती असताना अनुपने मारहाण केली आणि यामुळे पोटातील बाळाचा मृत्यू झाला. त्यानंतर पीडित महिलेला गर्भपात करावा लागला. 

या प्रकरणात पीडितेचं म्हणणं आहे की, अनुप हा घर सोडून आता गावी गेला आहे. पीडितेच्या पतीला याबाबतची माहिती होताच घरात वादाला तोंड फुटलं. पतीने अनुपच्या कुटुंबाला फोन केला आणि दोन्ही कुटुंबाकडून तडजोड करण्यात आली. यानंतर पीडित महिला ही अनुपसोबत दुसऱ्याच घरात राहू लागली. 

पीडितेच्या अल्पवयीन लेकीवर लैंगिक अत्याचार 

एवढेच नाही,तर अनुपने पीडितेच्या 11 वर्षीय मुलीसोबत अश्लील कृत्य केलं. अब्रूच्या भितीपोटी पीडित महिला आणि तिच्या मुलीने हा सर्व त्रास सहन केला. एवढंच नाही,तर त्या मुलीच्या चेहऱ्यावर अॅसिड हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. पीडितेनं याबाबत तिच्या कुटुंबियांना सांगितल्यानंतर त्यांनीही आरोपीचीच बाजू घेतली. 

हेही वाचा : माणूस म्हणायचा की सैतान? दीराने वहिणीची केली हत्या, मुंडकं हातात धरून रस्त्यावर फिरत होता

दरम्यान, संबंधित प्रकरणात एसीपी धर्मेंद्र कुमार रघुवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने केलेल्या तक्रारीच्या आधारे, आरोपी अनुप, त्याची आई द्रोपदी, वडील स्वामीनाथ आणि त्याचा मेहुणा अर्जुन सिंगविरोधात गुन्हा दाखल केला. संबंधित प्रकरणात पोलिसांनी पुरावे गोळा केले असून आरोपीचा जबाब नोंदवला असून कठोर कारवाई केली आहे.