तरुणीशी शरीरसंबंध ठेवत बनवले अश्लील व्हिडिओ, ब्लॅकमेल करत.. लाज आणणारी घटना

मुंबई तक

• 04:02 PM • 26 May 2026

Crime News : तरुणीशी प्रियकराने शरीरसंबंध ठेवत अश्लील व्हिडिओ बनवले. नंतर तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला. सुगौली पोलीस ठाणे परिसरात प्रियकराला भेटण्यासाठी आलेल्या तरूणीवर अमानुष अत्याचार झाला, या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली.

dozen obscene videos featuring underage boys girls in a hotel have gone viral but there is one thing common in all video

प्रातिनिधिक फोटो

Google CTA

बातम्या हायलाइट

point

पीडितेचा जबरदस्तीने बनवला अश्लील व्हिडिओ

point

प्रियकराला भेटण्यासाठी आलेल्या तरूणीवर अमानुष अत्याचार

Crime News : बिहारच्या मोतिहार जिल्ह्यात तरुणीशी प्रियकराने शरीरसंबंध ठेवत अश्लील व्हिडिओ बनवले. नंतर तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला. सुगौली पोलीस ठाणे परिसरात प्रियकराला भेटण्यासाठी आलेल्या तरूणीवर अमानुष अत्याचार झाला, या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेसंदर्भात प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, तरुणी तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी आली होती, त्याचदरम्यान चार जणांनी मिळून त्या तरुणीला आणि तरूणाला पकडले. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : बायकोला प्रेयसीच्या घरी नेलं, अन् सासऱ्यांना सांगितली 'ती' गोष्ट, भयंकर कांड उघडकीस

पीडितेचा जबरदस्तीने बनवला अश्लील व्हिडिओ

प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, या पुरूषांनी आधी त्या मुलीचा जबरदस्तीने अश्लील व्हिडिओ बनवला. नंतर संबंधित व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन एकामागून एक त्या महिलेवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. सामूहिक बलात्कारानंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. पीडितेनं कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली, या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. 

या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या. तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून सुरूवातीला दोघांना अटक केली. घडलेल्या घटनेनुसार, त्यांच्या इतर तीन साथीदारांना अटक करण्यात आली. या घटनेनंतर न्यायवैद्यक पथकाने घटनास्थळी दाखल होत पुरावे गोळा केले. अहवालानुसार, पोलिसांनी जलदगतीने खटला चालवून पीडितेला पूर्ण न्याय मिळवून देतील, असे त्यांनी म्हटले. पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी मोतिहारी रूग्णालयात पाठवण्यात आले.  

हे ही वाचा : Astrology : मंगळ ग्रहाचा काही राशीतील लोकांवर प्रभाव, आर्थिक आणि करिअरबाबत चांगले संकेत

या घटनेनंतर परिसरातील लोक संतप्त झालेत, सर्व आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करत असल्याचे वृत्त आहे. मोतिहारीचे एसपी स्वर्ण प्रभात यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन तातडीने विशेष स्थापन करण्याचे आदेश दिले.