लग्नाच्या तीन दिवसांपूर्वी तरुणी गर्भवती, नराधमानं गळा दाबून शेतात पुरलं

सुशांत काळे

• 07:00 AM • 26 Nov 2026

Crime News : लग्नाच्या अवघ्या तीन दिवस आधी एका 23 वर्षीय गर्भवती तरुणीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपीला अटक केली.

Crime News

Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

शेतातील खड्ड्यातून तरुणीचा मृतदेह

point

लग्नाच्या तीन दिवसांपूर्वी गर्भवती

Crime News : बिहारच्या किशनगंज जिल्ह्यातील पहारकट्टा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कला सिंधिया गावात लग्नाच्या अवघ्या तीन दिवस आधी एका 23 वर्षीय गर्भवती तरुणीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत पश्चिम बंगालच्या सीमेवरील रतनपूर गावातून मुख्य आरोपी बासिद आलम (वय 24) याला 17 नोव्हेंबर रोजी अटक केली आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : छत्रपती संभाजीनगरमधील नराधमाला दुबईतून अटक, लैगिंक शोषण अन् 19.73 लाखांची लूट

नेमकं काय घडलं? 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कला सिंधिया गावातीलवय रहिवासी असलेल्या जितालू यांनी 14 नोव्हेंबर रोजी आपली 23 वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याची लेखी तक्रार पहारकट्टा पोलीस ठाण्यात दाखल केली होती. 14 नोव्हेंबर रोजी पहाटे सुमारे 4 वाजता मुलीला नमाजसाठी उठवण्यासाठी गेले असता ती अंथरुणात आढळली नाही. शोधाशोध करूनही ती न सापडल्याने गुन्हा क्रमांक 297/26 अंतर्गत तपास सुरू करण्यात आला. पोलीस अधीक्षक संतोष कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली एसडीपीओ-1 खुसरू सिराज यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक स्थापन करण्यात आले. तपासादरम्यान 15 नोव्हेंबर रोजी गावातील एका शेतातील खड्ड्यातून तरुणीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. एफएसएल (FSL) पथकाने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले असून सदर रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.

पीडितेशी प्रेमसंबंध आणि सहा महिन्यांची गर्भवती

तांत्रिक आणि मानवी तपासात तरुणी बेपत्ता झाली त्या रात्री मुख्य आरोपी बासिद आलम याने तिला फोन केल्याचे निष्पन्न झाले. घटनेनंतर बासिद आणि त्याचे कुटुंबीय फरार झाले होते. चौकशीत बासिदने कबुली दिली की, गेल्या वर्षभरापासून त्याचे पीडितेशी प्रेमसंबंध होते आणि ती सहा महिन्यांची गर्भवती होती. पंचायत आणि नातेवाईकांच्या दबावामुळे त्यांचे लग्न 16 नोव्हेंबर रोजी ठरवण्यात आले होते; मात्र बासिद आणि त्याचे कुटुंब या विवाहासाठी तयार नव्हते.

हे ही वाचा : Crime News : स्थानकावर उभी असलेल्या रेल्वेत महिलेवर अत्याचार अन् मर्डर

लग्नातून सुटका करून घेण्यासाठी बासिदने वडील सलीमउद्दीन आणि भावासोबत कट रचल्याचे तपासात उघड झाले आहे. 13 नोव्हेंबरच्या रात्री सुमारे साडेदहा वाजता बासिदने भेटण्याच्या बहाण्याने तरुणीला घराजवळील अंगणवाडी केंद्रात बोलावले आणि तिच्याच दुपट्ट्याने गळा दाबून तिचा खून केला. त्यानंतर मृतदेह जवळच्या शेतात नेऊन कुदळीने खड्डा खणून पुरण्यात आला आणि सर्व आरोपी पसार झाले. इतर आरोपींचा शोध सुरू असल्याचे एसडीपीओ-1 खुसरू सिराज यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.