'माझी हो, नाहीतर कोणाचीच होऊ देणार नाही', चुलत दीरानं वहिनीला संपवलं

सुशांत काळे

• 08:00 AM • 25 Nov 2026

crime news : चुलत दीराने आपल्या वहिनीला मारहाण करून तिचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी बऱ्याच काळापासून त्या महिलेवर घरातून पळून जाण्यासाठी दबाव टाकत होता.

crime news

crime news

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

“माझी हो, नाहीतर दुसऱ्या कोणाचीही होऊ देणार नाही”

point

‘आई झोपली आहे’ समजून चिमुकल्यांकडून उठवण्याचा प्रयत्न

Crime News : उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद जिल्ह्यातील कपावली गावात शुक्रवारी रात्री झालेल्या वादानंतर एका चुलत दीराने आपल्या वहिनीला मारहाण करून तिचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी बऱ्याच काळापासून त्या महिलेवर घरातून पळून जाण्यासाठी दबाव टाकत होता. शनिवारी सकाळी लग्नाच्या सजावटीचे काम आटोपून पती घरी परतला, तेव्हा त्याला पत्नी तन्नू शर्मा हिचा मृतदेह स्वयंपाकघरात पडलेला आढळला.

हे वाचलं का?

हे ही वाचा : कोकण रेल्वेच्या वाहतुकीचे वेळापत्रक विस्कळीत, कोकणकन्यासह 'या' गाड्यांना सात तासांचा विलंब

मृत महिलेच्या चेहऱ्यावर आणि मानेवर जखमांच्या खुणा आढळून आल्या. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा व तपास सुरू केला. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

“माझी हो, नाहीतर दुसऱ्या कोणाचीही होऊ देणार नाही”

पतीने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तन्नूवर घरातून पळून जाण्यासाठी दबाव टाकत होता. त्याने तिला “माझी हो, नाहीतर मी तुला दुसऱ्या कोणाचीही होऊ देणार नाही,” अशी धमकीही दिली होती. या प्रकाराबाबत पतीने आपल्या चुलत भावाचा निषेध केला होता आणि आरोपीच्या माहेरच्या मंडळींकडेही तक्रार केली होती. मात्र, त्यानंतरही आरोपीचे वर्तन सुरूच राहिल्याने दोन्ही कुटुंबांमधील संबंध ताणले गेले होते.

‘आई झोपली आहे’ समजून चिमुकल्यांकडून उठवण्याचा प्रयत्न

वादाची सुरुवात झाली तेव्हा आरोपीने तन्नूच्या सहा वर्षीय सौम्या आणि तीन वर्षीय परी या दोन मुलींना खोलीत झोपायला पाठवले होते. खून केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. नंतर खोलीतून बाहेर आलेल्या या मुलींनी आपल्या आईला जमिनीवर पडलेले पाहिले; मात्र ती झोपली असावी असे समजून त्यांनी तिला हलवून उठवण्याचा प्रयत्न केला.

हे ही वाचा : Crime News : स्थानकावर उभी असलेल्या रेल्वेत महिलेवर अत्याचार अन् मर्डर

दुसरीकडे, आई जवळपास नसल्याने तीन महिन्यांची चिमुकली आराध्या भुकेमुळे रात्रभर रडत राहिली. मोठ्या दोन्ही बहिणींनी तिला शांत करण्याचाही प्रयत्न केला. या अमानुष घटनेमुळे तीन लहान मुलींनी आपल्या आईचे छत्र गमावले असून गावात हळहळ व्यक्त होत आहे.