नववीच्या विद्यार्थ्याने वर्गात आणली बंदूक, गोळी सुटली अन् ..

सुशांत काळे

• 07:00 AM • 25 Nov 2026

Crime news : इयत्ता नववीच्या एका विद्यार्थ्याकडून चुकून बंदूकीतून गोळी चालवली गेली, त्यानंतर तिच गोळी वर्गातीलच दुसऱ्या विद्यार्थ्याला लागली. या घटनेत जखमी झालेल्या विद्यार्थ्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

Crime news

Crime news

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

नववीच्या विद्यार्थ्याच्या बंदुकीतून सुटली गोळी

point

जखमीला उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल

Crime News : केरळमधील पालक्काड जिल्ह्यातील थ्रिताला परिसरात असलेल्या 'परुथुर हायर सेकंडरी स्कूल'मध्ये गोळीबाराची खळबळजनक घटना समोर आली आहे. इयत्ता नववीच्या एका विद्यार्थ्याकडून चुकून बंदूकीतून गोळी चालवली गेली, त्यानंतर तिच गोळी वर्गातीलच दुसऱ्या विद्यार्थ्याला लागली. या घटनेत जखमी झालेल्या विद्यार्थ्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

हे वाचलं का?

हे ही वाचा : पालघर : बाईक आणि ट्रकचा भीषण अपघात, दुर्घटनेत 3 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

नववीच्या विद्यार्थ्याच्या बंदुकीतून सुटली गोळी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नववीतील एक विद्यार्थी घरून बंदूक शाळेत घेऊन आला होता. आपल्या वर्गमित्रांना ती बंदूक दाखवण्याचा त्याचा हेतू होता. वर्गात विद्यार्थी ती बंदूक पाहत असताना अचानक गोळी सुटली आणि ती एका विद्यार्थ्याच्या हाताला लागली. प्राथमिक तपासात ही घटना अपघाताने घडल्याचे स्पष्ट होत आहे.

विद्यार्थी जखमी झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल

गोळीबारानंतर शाळेच्या परिसरात घबराट आणि खळबळ उडाली. जखमी विद्यार्थ्याला त्वरित उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. घटनेची माहिती मिळताच थ्रिताला पोलिसांनी शाळेत धाव घेत घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू केला आहे.

हे ही वाचा : नागपूर: 19 वर्षीय BDS विद्यार्थ्यावर रॅगिंग, अश्लील कृत्य केल्याचा आरोप

सदर विद्यार्थी घरून बंदूक शाळेत कशी घेऊन आला आणि वर्गात ती नेमकी कशी चालली गेली, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. या घटनेबाबत अधिक माहितीची प्रतीक्षा असून, पोलीस तपासानंतरच संपूर्ण बाबी स्पष्ट होणार आहेत.