Shocking Murder Case Viral News : मध्य प्रदेशच्या इंदौरमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. चारवेळा लग्न केलेल्या सुनेनं घरात कोणी नसताना मोठा कांड केला. ती तिच्या सासूला बाथरूममध्ये घेऊन गेली अन् असं काही केलं की, सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. घटना घडल्यानंतर जेव्हा महिलेचा पती बाथरूममध्ये आला, तेव्हा आरडाओरडा सुरु झाला. काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊयात..
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना इंदौरच्या विजय नगरमध्ये घडली. येथील शीतल नगरचा रहिवासी संदीपचं लग्न एका वर्षापूर्वी नेहा नावाच्या महिलेसोबत झाला होता. हे नेहाचं चौथं लग्न होतं. लग्नानंतर नेहा आणि तिची सासू गोमती बाई यांच्या छोट्या छोट्या कारणावरून वादविवाद व्हायचे. संदीप नोकरीसाठी बाहेर जायचा. नेहाची तब्येत ठीक नसल्याने तिने तिच्या सासूला जेवण बनवायला सांगितलं. पण गोमतीने जेवण बनवायला नकार दिला.
सूनेनं सासूला बाथरूममध्ये फरफटत नेलं आणि...
सासू आणि सुनेत वादविवाद झाले, तेव्हा संदीप घरी नव्हता. वाद इतका वाढला की, दोघींमध्ये हाणामारी झाली. रागाच्या भरात नेहाने गोमतीला फरपटत बाथरूममध्ये नेलं आणि धक्का देऊन खाली पाडलं. जवळच असलेला दगड उचलून गोमतीचं डोकं फोडलं. यामुळे गोमती गंभीर जखमी झाली.
आईला पाहून मुलाच्या पायाखालची वाळूच सरकली..
घटनेची माहिती मिळताच,संदीप आणि तिचा पती कौशल घरी पोहोचला. आई गंभीर जखमी झाल्याचं त्याने पाहिलं. त्यानंतर त्याने गोमतीला रुग्णालयात नेलं. पण डॉक्टरांनी गोमतीला मृत घोषित केलं. पोलिसांनी तातडीनं कारवाई करत, नेहा अटक केली. तिच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहा आणि संदीपच्या लग्नाला फक्त एक वर्ष झाला होता. पोलिसांकडून या घटनेचा कसून तपास केला जात आहे.
ADVERTISEMENT
