Delhi Blast: डॉ. मुझम्मिलसोबत प्रेमसंबंध! पतीपासून घेतला घटस्फोट, डॉ. शाहीन शाहीदचं महाराष्ट्रातील कनेक्शन आलं समोर...

पोलिसांच्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील एका तरुणासोबत डॉ. शाहीनचं लग्न झालं होतं. मात्र, मुझम्मिलसोबत असलेल्या प्रेमसंबंधामुळे तिने आपल्या पतीसोबत घटस्फोट घेतला होता.

डॉ. शाहीन शाहीदचं महाराष्ट्रातील कनेक्शन आलं समोर...

डॉ. शाहीन शाहीदचं महाराष्ट्रातील कनेक्शन आलं समोर...

मुंबई तक

• 11:45 AM • 12 Nov 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

डॉक्टर शाहीन शाहिदचे डॉ. मुझम्मिलसोबत प्रेमसंबंध!

point

शाहीन शाहीदचं महाराष्ट्रातील कनेक्शन आलं समोर...

Dr. Shaheen Shahid: दिल्लीत झालेल्या भीषण स्फोटापूर्वी पोलिसांनी आंतरराष्ट्रीय दहशतवादी नेटवर्कचा पर्दाफाश केल्यानंतर पोलिसांनी आठ लोकांना ताब्यात घेतलं होतं. यातील लखनऊच्या डॉ. शाहीन शाहीद या महिला डॉक्टरचा सुद्धा समावेश असल्याची माहिती समोर आली. तपासादरम्यान, शाहीनचा जैश या दहशतवादी संघटनेशी कनेक्शन असल्याचं स्पष्ट झालं. आता या डॉक्टरबद्दल आणखी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. खरं तर, शाहीनचं मुंबईशी कनेक्शन असल्याचं उघडकीस आलं आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील एका तरुणासोबत डॉ. शाहीनचं लग्न झालं होतं. मात्र, 2015 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला आणि त्यानंतर, ती पुन्हा उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे गेली. 

हे वाचलं का?

महाराष्ट्रातील तरुणासोबत लग्न झालं होतं...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. शाहीनचं जफर हयात नावाच्या तरुणासोबत लग्न झालं होतं. मात्र, त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही आणि 2015 मध्ये दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, शहीनचे डॉ. मुझम्मिलसोबत प्रेमसंबंध असल्याने तिने पतीपासून घटस्फोट घेतला होता. घटस्फोटानंतर, हरियाणाच्या फरीदाबाद येथील अल-फलाह विद्यापीठात शाहीनने काम करण्यास सुरूवात केली. डॉ. मुझम्मिल सुद्धा त्याच ठिकाणी काम करत होता. 

हे ही वाचा: Delhi Blast: डॉ. शाहीन शाहीद कारमध्ये ठेवायची A-47, कोण आहे 'ही' भयंकर महिला?

शाहीनच्या वडिलांनी दिली माहिती 

डॉक्टर शाहीनच्या वडिलांनी सुद्धा त्यांच्या मुलीने महाराष्ट्रातील एका व्यक्तीशी लग्न केलं असल्याचं सांगितलं होतं. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जसजशी डॉ. शाहीनशी संबंधित अधिक माहिती समोर येत जाईल तसतशी तपासाची व्याप्ती वाढू शकते आणि त्यात महाराष्ट्राचाही समावेश होऊ शकतो. प्राथमिक तपासानुसार, शाहीन ही जैश-ए-मोहम्मदने सुरू केलेल्या जमात-उल-मोमिनतमध्ये काम करत होती. डॉ. शाहीनवर भारतातील जैश-ए-मोहम्मद (जेईएम) च्या महिला भरती शाखेत काम करत असल्याचा आरोप आहे.

हे ही वाचा: Delhi Blast: तपासात उघड झाली अत्यंत मोठी माहिती, ‘ती’ गोष्ट झाली नसती तर अत्यंत भयंकर…

पोलीस अधिकाऱ्यांनी आरोप केला की, डॉ. शाहीन पाकिस्तानातील तिच्या आकाच्या संपर्कात होती आणि तिला दहशतवादी कारवायांसाठी शक्य तितक्या जास्त महिलांची भरती करण्याचे निर्देश देण्यात आले होते. लखनऊमधील तिच्या वडिलांनी दहशतवादी कारवायांमध्ये मुलीच्या सहभागाबद्दल काहीच माहिती नसल्याचं सांगितलं आणि त्यांना शाहीनच्या अटकेची माहिती माध्यमांद्वारेच मिळाली असल्याचं देखील ते म्हणाले. 

    follow whatsapp