Dharashiv Crime News : धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग येथे जुन्या वादातून एक धक्कादायक हत्याकांड घडलं आहे. मंगळवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास शिवराज हॉटेल अँड बारसमोर ही घटना घडली. सूर्यकांत उर्फ पप्पू सुरवसे (नळदुर्ग) यांची जयकुमार गायकवाड आणि त्याचा मुलगा सोहन गायकवाड यांनी मिळून हत्या केली. हा सगळा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >>नांदेड हादरलं! अचानक पूर आला आणि माय-लेकीसह भाची वाहून गेली, दीड किलोमिटर दूर...
सीसीटीव्हीमध्ये काय दिसतंय?
कोयत्याने वार करत मरेपर्यंत मारल्याची सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. फुटेजमध्ये दिसत असलेल्या दृश्यांनुसार जयकुमार गायकवाड याने सूर्यकांत यांना चाकू दाखवत धमकावलं. त्याचवेळी मुलगा सोहन गायकवाड याने धावत येऊन सूर्यकांत यांच्यावर कोयत्याने वार करायला सुरूवात केली.
मुलगा वार करत राहिला, बापाने मध्ये येणाऱ्यांना रोखलं
हा सगळा वाद सुरू असताना दोघांनी मध्ये येत त्यांना थांबण्याचा प्रयत्न केला. मात्र, सोहन थांबला नाही. त्यानं मध्ये येणाऱ्यांनाही कोयत्याचा धाक दाखवत मागे सरकवलं. सोहनने पुन्हा वार करायला सुरूवात केली. त्यावेळी वडिलांनी मध्ये येणाऱ्या लोकांना रोखून धरलं. अशा पद्धतीनं सूर्यकांत यांच्यावर तब्बल 17 वार केले. ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
हे ही वाचा >>गँगरेपनंतर नराधमांनी महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये हात टाकून आतडीच... प्रचंड चीड आणणारी घटना
सामाजिक काम करण्याच्या वादातून हत्या?
सूर्यकांत आणि गायकवाड कुटुंबीयांमध्ये जुन्या वाद असल्याचे सांगितले जातंय. मृत सूर्यकांत यांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीत, "सामाजिक कार्य का करतो?" असा जाब विचारत आरोपींनी पतीची हत्या केल्याचा आरोप केला आहे. नळदुर्ग पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून सोहन गायकवाड याला ताब्यात घेतलं आहे.
दरम्यान, आरोपी जयकुमार गायकवाड सध्या फरार आहे. सूर्यकांत यांच्या कुटुंबीयांनी आरोपींच्या तात्काळ अटकेची मागणी करत आक्रोश व्यक्त केला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
ADVERTISEMENT
