धुळे : कला केंद्रातील महिलेला पेट्रोल ओतून जिवंत जाळलं, मृतदेह पाहावेना; क्रूरतेचा कळस!

मुंबई तक

28 Sep 2026 (अपडेटेड: 28 Sep 2026, 01:26 PM)

Dhule Crime News : कला केंद्रातील अंतर्गत वादातून रायगडच्या गर्भवती महिलेची धुळ्यातील गरताडबारी येथे पेट्रोल ओतून जाळून हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. मोहाडी पोलिसांनी अवघ्या तीन दिवसांत या प्रकरणाचा तपास करत चार आरोपींना अटक केली असून दोन आरोपी फरार आहेत.

Dhule Crime News

Dhule Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

धुळे : कला केंद्रातील महिलेला पेट्रोल ओतून जिवंत जाळलं

point

मृतदेह पाहावेना; क्रूरतेचा कळस!

Dhule Crime News , धुळे : कला केंद्रातील अंतर्गत वादातून रायगडच्या एका गर्भवती महिलेची धुळ्यातील गरताडबारी येथे पेट्रोल ओतून जाळून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाचा मोहाडी पोलिसांनी अवघ्या तीन दिवसांत छडा लावला असून चौघांना अटक केली आहे. पोलिसांच्या तपासात अटक करण्यात आलेल्या आरोपींनी महिलेची हत्या केल्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. मृत महिलेचं नाव पिंकी हनुमंत काटकर (वय 31, रा. रायगड) असं आहे. 

हे वाचलं का?

हेही वाचा : जालना : छकुलीचे गावातल्या परपुरुषाशी प्रेमसंबंध, प्रियकराच्या मदतीने नवऱ्याची हत्या; अपघाताचा बनाव

हत्या प्रकरणात चौघांना अटक, दोन आरोपी फरार 

या प्रकरणात सर्फराज ऊर्फ शफिक अलीम मोमिन (वय 38, रा. धाराशिव), आरिफ उर्फ खुज्या आसिफ शेख (31, रा. धाराशिव), स्वाती उर्फ आरती गणेश कुऱ्हाडे (28, रा. अहिल्यानगर) आणि लक्ष्मी बालाजी पवार (30, रा. धाराशिव) या चौघांना अटक करण्यात आली आहे. तर फारुख शेख ( रा. धाराशिव) आणि रोहिणी जाधव (रा. छत्रपती संभाजीनगर) हे दोघे फरार असल्याची माहिती आहे.

हेही वाचा : पैशांचा हव्यास ते डॉक्टरला मारहाण; दिव्या शिंदेने जे कांड केले ते वाचाच, 10 गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचले पोलीस 

घटना घडल्यानंतर मोहाडी पोलिसांसह एलसीबीच्या पोलीस अधिकाऱ्यांनी महामार्गावरील विविध ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजची सलग 11 तास तपासणी केली. या तपासादरम्यान हुंडाई मोबिलो क्रमांक MH 43 / AR 4070 हे संशयित वाहन पोलिसांच्या निदर्शनास आले. या वाहनाच्या आधारे तपास पथकाने धाराशिव आणि अहिल्यानगर येथे शोध घेतला. त्यानंतर कला केंद्रात काम करणाऱ्या दोन महिलांसह चौघांना अटक करण्यात आली. जळालेल्या अवस्थेतील महिलेचा मृतदेह गरताडबारी परिसरात आढळल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज आणि संशयित वाहनाच्या आधारे तपास पुढे नेण्यात आला.

पोलिसांच्या तपासानुसार, कला केंद्रातील अंतर्गत वादातून संबंधित महिलेची हत्या करण्यात आली. सर्व आरोपींनी बीड येथे गर्भवती महिलेला मारहाण केली. या मारहाणीत महिला बेशुद्ध झाली होती. त्यानंतर आरोपी राजस्थानच्या दिशेने निघाले होते. प्रवासादरम्यान धुळ्यातील गरताडबारी येथे आल्यानंतर महिलेवर पेट्रोल ओतून तिला जाळण्यात आल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे. या घटनेत पिंकी हनुमंत काटकर यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर मोहाडी पोलिसांनी आणि एलसीबीच्या पथकाने महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यावर भर दिला. तब्बल 11 तासांच्या तपासणीनंतर संशयित वाहनाचा माग काढण्यात पोलिसांना यश आलं.

या प्रकरणातील दोन आरोपी अद्याप फरार असून मोहाडी पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी अवघ्या तीन दिवसांत या गुन्ह्याचा तपास करत चार जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. गर्भवती महिलेला बीड येथे मारहाण करून बेशुद्ध केल्यानंतर तिला राजस्थानच्या दिशेने नेत असताना धुळ्यातील गरताडबारी परिसरात पेट्रोल ओतून जाळण्यात आल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. या गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध मोहाडी पोलिसांकडून घेतला जात आहे.