Crime News : आपला समाज अधिकाधिक हिंसक होत चालला आहे याची साक्ष देणाऱ्या अनेक घटना दररोज घडत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका प्रियकराने प्रेयसीची हत्या केली आणि तिच्या मृतदेहावर बसून तो दारु प्यायली. धक्कादायक म्हणजे प्रेयसीची बदनामी व्हावी या उद्देशाने तिच्याच मोबाईलवरुन तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ व्हॉट्स अॅप ग्रुप्सवर शेअर केले. पीयूष असं या आरोपीचं नाव आहे. या संतापजनक प्रकारानंतर आरोपीच्या वडिलांनीही कठोर शिक्षेची मागणी केली आहे. मृत तरुणी ही एमबीएचे शिक्षण घेत होती. मध्य प्रदेशातील इंदोरमधील ही घटना आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : पंढरपूर : सासूला मारण्यासाठी सुनेनं पाण्यात मिसळलं विष, पण नवऱ्याचाच गेला बळी... कसा फसला महिलेचा डाव?
'असा' झाला हत्याकांडाचा उलगडा
10 फेब्रुवारी रोजी पीयूषने विद्यार्थिनीला आपल्या भाड्याच्या खोलीवर बोलावले होते. तिथे त्यांच्यात वाद झाला आणि रागाच्या भरात त्याने तिची हत्या केली. हत्येनंतर त्याने तिच्याच मोबाईलवरून आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल केले. या क्रूर कृत्यानंतर आरोपी ट्रेनने महाराष्ट्रातील पनवेल आणि त्यानंतर मुंबईला पळून गेला होता. 13 फेब्रुवारी रोजी खोलीतून दुर्गंधी येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली, त्यानंतर या भीषण हत्याकांडाचा खुलासा झाला.
संशयातून हत्या
पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, पीडित तरुणीचे दुसऱ्या कोणाशी तरी संबंध असल्याचा संशय पीयूषला होता. याच संशयातून त्याने हे कृत्य केले. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळाचे 'सीन रिक्रिएशन' करण्यात आले असून फॉरेन्सिक पुरावे गोळा केले आहेत. सध्या पोस्ट मार्टम अहवालाची प्रतीक्षा असून, त्यानंतर या प्रकरणात आणखी काही धक्कादायक तथ्ये समोर येण्याची शक्यता आहे. पोलीस या प्रकरणात लवकरात लवकर दोषारोपपत्र दाखल करून आरोपीला कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
हे ही वाचा : सॅनिटायझर ओतून गर्लफ्रेंडच्या गुप्तांगाला लावली आग, बॉयफ्रेंडचं सैतानी कृत्य; नेमकं कारण काय?
'मला त्याचे तोंडही पहायचे नाही'
या घटनेमुळे आरोपीच्या कुटुंबालाही मोठा धक्का बसला आहे. त्याच्या वडिलांनी आपल्या मुलाच्या कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. 'माझ्या मुलाचे मला तोंडही पाहायचे नाही, त्याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे,' अशी संतप्त भावना त्याच्या वडिलांनी व्यक्त केली आहे. जानेवारी महिन्यात त्यांना या दोघांच्या नात्याबद्दल समजले होते आणि त्यांनी पीयूषला समज देण्याचा प्रयत्नही केला होता, मात्र त्याने त्यांचे ऐकले नाही.
ADVERTISEMENT











