महिला हॉटेलमध्ये प्रियकरासोबत आलेली रंगात, पतीची अचानक एंट्री.. थेट छातावरून मारली उडी

मुंबई तक

17 Jun 2025 (अपडेटेड: 17 Jun 2025, 10:20 PM)

Extramarital affairs : उत्तर प्रदेशातील बागमध्ये एका महिलेनं पोलिसांच्या भीतीनं थेट छतावरून उडी मारत पळ काढला आहे. याचं ठोस कारण आता समोर आलं आहे. महिला आपल्या प्रियकरासोबत एका हॉटेलमध्ये आली होती. अशावेळी तिचा पतीही त्याच ठिकाणी पोलिसांसह पोहोचला होता. आपला नवरा पोलिसांसोबत असल्याचे पाहून तिने छतावरून उडी मारली आणि तिथून पळ काढला.

extramarital affairs

extramarital affairs

Google CTA

बातम्या हायलाइट

point

एका महिलेनं पोलिसांच्या भीतीनं थेट छतावरून उडी मारत पळ काढला

point

कारण ऐकूण आश्चर्याचा बसेल धक्का

Extramarital affairs : उत्तर प्रदेशातील बागमध्ये एका महिलेनं पोलिसांच्या भीतीनं थेट छतावरून उडी मारत पळ काढला आहे. याचं ठोस कारण आता समोर आलं आहे. महिला आपल्या प्रियकरासोबत एका हॉटेलमध्ये आली होती. अशावेळी तिचा पतीही त्याच ठिकाणी पोलिसांसह पोहोचला होता. आपला नवरा पोलिसांसोबत असल्याचे पाहून तिने छतावरून उडी मारली आणि तिथून पळ काढला. महिलेनं छतावर उडी मारतानाचा व्हिडिओ एका व्यक्तीने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला असून सध्या तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

हे वाचलं का?

हेही वाचा : महिलेनं आधी नवऱ्याला सोडलं, नंतर दुसरा धरला अन् थेट मुलालाच...आई नाही ही तर कसाई

संबंधित चर्चेत असलेले प्रकरण बरौत येथील कोतवाली भागातील आहे. महिलेच्या पतीने पोलिसांसोबत रंगेहाथ पकडण्याचा प्रयत्न केला असता, महिलेनं थेट एका घराच्या छतावर उडी मारली आणि घटनास्थळावरून पळ काढला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला कक्षात समुपदेशनाचा खटला सुरु आहे. दरम्यान, महिला ही बागपातच्या बरौत येथे पोहोचली आणि नंतर ती तिच्या प्रियकरासोबत हॉटेल हॉलिडेमध्ये पोहोचली. 

महिलेचा पती अगदी शांतपणे तिचा पाठलाग करायचा. 112 या क्रमांकावर फोन लावून पोलिसांना सतत बोलावत होता. पोलीस हॉटेलमध्ये पोहोचताच, महिलेनं भीतीच्या पोटी घराच्या छतावर 12-13 फुट उंचीवरून उडी घेतली आणि घटनास्थळावरून पळ काढला. संबंधित प्रकरणात पोलीस पुढील कारवाई सुरू आहे. तर सध्या पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. व्हायरल व्हिडिओच्या आधारे तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

हेही वाचा : 'सत्तेसाठी भाजपसोबत जाऊन बसायचं.. संधीसाधूपणाचं राजकारण', पवार स्पष्टच बोलले; अजितदादांसोबत जमणार नाहीच?

दरम्यान, पोलिसांनी हॉटेलच्या भूमिकेवरही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अशातच आता या प्रकरणात पोलीस पुढील तपास करत आहेत.