Extramarital Affairs : विवाहित मुलांचा डोळा हा आपल्या मेहुणीवर असतो. अनेकदा दोघांमध्ये चेष्टी मस्करी देखील होताना दिसते. पण हे कोणत्याच पुरुषाच्या पत्नीला न पटण्यासाखंच आहे. आता अशीच एक घटना जोधपूर जिल्ह्यधिकारी कार्यालायाच्या बाहेर घडली आहे. पती आपल्याच मेहुणीला घेऊन फिरत होता. इतक्यातच पत्नीने पतीला रंगेहाथ पकडून हेल्मेटने मारहाण केली आहे. ही घटना मंगळवारी उघडकीस आली आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Mumbai Crime : शिक्षिका विद्यार्थ्याला हॉटेलमध्ये घेऊन जायची अन् पाजायची दारू, ड्रग्ज नंतर...न्यायालयाचा धक्कादायक निर्णय
नेमकं काय घडलं?
राजस्थानातील जोधपूर येथे एका पत्नीने तिच्या पतीला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर फिरताना पाहिलं. ही घटना मंगळवारी दुपारी 1.30 वाजता उघडकीस आली आहे. जिथं पत्नीने तिच्या पतीला त्या कार्यालयाच्या आवारातच मारहाण केली आहे. त्यानंतर या आवारात एकच गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर पतीला रंगेहाथ पकडले होते. रागाच्या भरात पत्नीने पतीला मारहाण केली. पत्नीने थेट पतीच्या डोक्यातच हेल्मेट घातलं आणि मारहाण केली, याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय.
पतीचे आपल्याच बहिणीशी म्हणजेच मेहुणीशी अवैध संबंध होते, असा आरोप करण्यात आला आहे. याच रागातून पत्नीने मारहाण केली आहे. पत्नीनं आरोपीला मारहाण केली असताना, आजूबाजुच्या लोकांनी हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली. त्यामुळे पती कसाबसा वाचला.
व्हिडिओ तुफान व्हायरल
संबंधित घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये पत्नी पतीला हेलमेटनं मारहाण करताना दिसत आहे. ती पतीला त्याच्या मेव्हण्यासोबत फिरण्याबद्दल आणि त्याच्या नात्याबद्दल प्रश्न विचारण्यात आले.
हेही वाचा : भयंकर! शरीराची भूक भागवता न आल्याच्या पत्नीने उचललं टोकाचं पाऊन, पतीसोबत नेमकं काय घडलं?
संबंधित प्रकरणाची माहिती पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पती, पत्नी आणि मेहुणीला पोलीस ठाण्यात नेलं. त्यानंतर चौकशीसाठी नेलं. पोलिसांनी तिघांनाही न भांडण्याचा इशारा दिला आहे. अनैतिक संबंधातून ही घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे, अशी माहिती उदय मंदिर पोलीस ठाण्याचे अधिकारी सीताराम खोजा यांनी दिली आहे.
ADVERTISEMENT
