क्लासला जाण्यासाठी घराबाहेर पडली, नंतर अपहरण करून सामूहिक बलात्कार... पीडितेला 'त्या' ठिकाणी फेकलं अन्...

घरातून कोचिंग क्लाससाठी बाहेर पडलेल्या एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घडल्याचं समोर आली आहे.

अपहरण करून सामूहिक बलात्कार... पीडितेला 'त्या' ठिकाणी फेकलं अन्...

अपहरण करून सामूहिक बलात्कार... पीडितेला 'त्या' ठिकाणी फेकलं अन्...

मुंबई तक

• 10:24 AM • 19 Sep 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

अल्पवयीन मुलीचं अपहरण करून सामूहिक बलात्कार...

point

घृणास्पद कृत्य केल्यानंतर पीडितेला 'त्या' ठिकाणी फेकलं अन्...

Rape Case: घरातून कोचिंग क्लाससाठी बाहेर पडलेल्या एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घडल्याचं समोर आली आहे. आरोपींनी पीडितेसोबत घृणास्पद कृत्य केल्यानंतर तिला आपल्या कारमधून तिच्या घराबाहेर फेकलं आणि तिथून ते फरार झाले. मंगळवारी (16 सप्टेंबर) पीडिता आपल्या घरातून ट्यूशनसाठी जात असताना तिच्यासोबत ही धक्कादायक घटना घडली. इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून पीडिता आणि दोन्ही आरोपींची ओळख झाल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांनी शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये प्रकरणासंबंधी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. 

हे वाचलं का?

दोन तरुणांकडून सामूहिक बलात्कार...

पोलिसांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितलं की 11 वीत शिकणाऱ्या एका विद्यार्थीनीचं दोन तरुणांनी अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. अल्पवयीन तरुणीसोबत असं घृणास्पद कृत्य केल्यानंतर आरोपींनी तिला कारमधून तिच्या घराबाहेर फेकलं आणि ते पळून गेले. पीडिता ट्यूशनला जात असताना आरोपींनी तिच्यासोबत हे लज्जास्पद कृत्य केलं. दोन ते तीन महिन्यांपूर्वी आरोपी आणि पीडितेची इंस्टाग्रामवर ओळख झाली होती. 

हे ही वाचा: 71 वर्षांच्या महिलेवर जडलं प्रेम! लग्नासाठी बोलवलं अन् नको तेच घडून बसलं...

पीडितेचे कुटुंबीय शिवाजी नगर पोलीस स्टेशन परिसरात राहत असल्याची माहिती मुलीच्या वडिलांनी तक्रार करताना सांगितली. तसेच, पीडितेचे वडील गुरुग्राममधील एका खाजगी कंपनीत काम करत असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांची मोठी मुलगी 17 वर्षांची असून ती 11वीत शिकत असल्याची माहिती आहे. ती दररोज संध्याकाळी साडे चार ते साडे सहा या वेळेत ट्यूशनला जात होती. 

बराच काळ घरी परतली नाही अन्...

घटनेच्या दिवशी क्लास सुटल्यानंतर पीडिता बराच काळ घरी परतली नसल्याने तिच्या कुटुंबियांना मुलीची चिंता वाटू लागली. कुटुंबियांनी तिचा शोध घेतल्यानंतर सुद्धा ती सापडली नाही. मात्र, रात्री 8 वाजता पीडिता बेशुद्ध अवस्थेत घराबाहेर आढळली. 

हे ही वाचा: साखरपुड्याच्या आधी तिन्ही बहिणींनी एकाच वेळी सगळ्यांना हादरवलं, प्रियकरासाठी...

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारीच्या आधारे शिवाजी नगर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध पोक्सो अॅक्टअंतर्गत इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरूवात केली असून सीसीटीव्ही फुटेजचा देखील तपास केला जात असल्याची माहिती आहे. तपासादरम्यान, साक्षीदार आणि पुराव्यांच्या आधारे कारवाई केली जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. 

    follow whatsapp