Crime News : होणाऱ्या बायकोला Instagram वर मेसेज केल्यानं राग आला, सपासप वार करत तरूणाला संपवलं

गेल्या शनिवारी 28 डिसेंबरला रात्री उशिरापर्यंत दशरथ हा मुलगा घरी परतला नाही म्हणून त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला. मात्र काही वेळाने नंतर थेच त्याचा मृतदेह सापडला.

Mumbai Tak

मुंबई तक

• 02:12 PM • 01 Jan 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

Instagram वर मेसेज करणं भोवलं

point

तरूणीच्या होणाऱ्या पतीने तरूणाला संपवलं

आपल्या होणाऱ्या पत्नीला इन्स्टाग्रामवर मेसेज केल्यामुळे थेट हत्या केल्याची घटना समोर आली आहे. गुजरातच्या गांधीनगरमधील ढोलकुंवा गावाजवळ एका मुलाचा मृतदेह आढळून आला होता. याचं गूढ आज गांधीनगर पोलिसांनी उकललं आहे. यानंतर पोलिसांनी आरोपी आणि त्याच्या मित्राला अटक केली आहे. गुजरातमधील गांधीनगरमधील ढोलकुनवामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.

हे वाचलं का?

गेल्या शनिवारी रात्री उशिरापर्यंत दशरथ हा मुलगा घरी परतला नाही म्हणून त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला. मात्र काही वेळाने नंतर थेच त्याचा मृतदेह सापडला. कुटुंबाकडून तत्काळ पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. तपासाअंती पोलिसांनी सिहोली गावातील राहुलला पकडलं आणि त्यानंतर संपूर्ण गूढ उकललं. गांधीनगर पोलिसांनी सांगितले की, दशरथच्या हत्येप्रकरणी राहुल आणि त्याच्या अल्पवयीन मित्राला अटक करण्यात आली आहे.

हे ही वाचा >> Walmik Karad Beed : वाल्मिक कराडने रात्री जेवण केलं नाही, सकाळी नाश्ताही टाळला? संध्याकाळी जेवायला काय मागितलं?

मृत दशरथने राहुल नावाच्या व्यक्तिच्या होणाऱ्या पत्नीला इन्स्टाग्रामवर मेसेज केल्याची माहिती मिळाली होती. राहुलकडे त्याच्या होणाऱ्या पत्नीचा इन्स्टाग्राम अकाउंटचा पासवर्डही होता. त्याने अकाऊंट चेक केलं आणि दशरथचे मेसेज बघून त्याला त्याच अकाऊंटवरुन मेसेज करत भेटायला बोलावलं.

हे ही वाचा >> Santosh Deshmukh Murder Case : वाल्मिक कराड अडकला कचाट्यात.. कोर्टाचा मोठा निर्णय, उशिरा रात्री काय-काय घडलं?

आरोपीने मृत दशरथला सांगितलं की, माझ्या होणाऱ्या पत्नीला मेसेज करू नको. तेव्हा दशरथने ते ऐकलं नाही. मला पाहिजे ते मी करेल असं दशरथ म्हणताच आरोपी राहुलने दशरथवर चाकूने सपासप वार करून त्याचा जीव घेतला.