Santosh Deshmukh Murder Case : वाल्मिक कराड अडकला कचाट्यात.. कोर्टाचा मोठा निर्णय, उशिरा रात्री काय-काय घडलं?
Walmik Karad CID Custody: वाल्मिक कराड याला सत्र न्यायालयाने जामीनाची मागणी फेटाळत 15 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे. त्यामुळे वाल्मिक कराडला मोठा धक्का बसला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

वाल्मिक कराडचा ताबा मिळावा यासाठी रात्री उशिरा सुनावणी

सरकारी वकील जे. बी. शिंदेंनी केला जोरदार युक्तिवाद

कोर्टाच्या निर्णयाने वाल्मिक कराडला मोठा धक्का
बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सीआयडीने कारवाईला सुरुवात केलेली असताना दुसरीकडे खंडणी प्रकरणातील फरारी असलेला आरोपी वाल्मिकी कराड याने काल (31 डिसेंबरो) पुणे सीआयडी कार्यालयात आत्मसमर्पण केलं. त्यानंतर त्याला बीड सीआयडीच्या ताब्यात सोपविण्यात आलं. पण त्याला जामीन मिळू नये यासाठी सीआयडी कोर्टाला रात्रीच सुनावणी घेण्याची मागणी केली. त्यानुसार रात्री उशिरा ही सुनावणी पार पडली. ज्यामध्ये वाल्मिकी कराड याला कोर्टाने 15 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे. (beed santosh deshmukh murder case walmik karad now in cid custody for 15 days court gave big decision see what happened in court late at night)
नेमकं काय घडलं कोर्टात?
वाल्मिकी कराड हा बीड सीआयडीच्या ताब्यात आल्यानुसार सगळ्यात आधी त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यानंतर त्याला केज सत्र न्यायालयात रात्री उशिरा हजर करण्यात आलं. खंडणी प्रकरणात चौकशीसाठी वाल्मिकीचा ताबा मिळावा यासाठी रात्री उशिरा सुनावणी पार पडली. यावेळी सरकारी वकील जे. बी. शिंदे यांनी वाल्मिक कराडला 15 दिवसांची सीआयडी कोठडी मिळावी यासाठी जोरदार युक्तिवाद केला.
हे ही वाचा>> '...तर धनंजय मुंडेंही आत जाऊ शकतात', वाल्मिक कराडच्या अटकेनंतर सुरेश धसांच्या वक्तव्याने खळबळ
तर वाल्मिक कराड सीआयडीला शरण आले आहेत असून त्यांना जामीन मिळायला हवा, असा युक्तिवाद करत वाल्मिकीचे वकील अशोक कवडे यांनी त्याच्या बचावाचा प्रयत्न केला. मात्र, कोर्टाने वाल्मिक कराडच्या वकिलांची मागणी फेटाळून लावत वाल्मिकीला 15 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी या सगळ्याची सीआयडीला चौकशी करता येणार आहे.
ऐनवेळी सरकारी वकिलाने केस लढण्यास दिला नकार, अन्...
वाल्मिक कराडच्या खंडणी केस प्रकरणातील वकील बदलण्यात आला आहे. सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यात आलेल्या एस. एस. देशपांडे यांनी अचानक आपण ही केस लढविण्यास तयार नसल्याचं सांगितलं. त्याबाबत त्यांनी कोर्टाकडे पत्रंही दिलं. वैयक्तिक कारणास्तव त्यांनी ही केस लढण्यास नकार दिला आणि अन्य वकील नेमावा असं पत्रात म्हटलं. त्यानंतर जे. बी. शिंदे यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली.