'...तर धनंजय मुंडेंही आत जाऊ शकतात', वाल्मिक कराडच्या अटकेनंतर सुरेश धसांच्या वक्तव्याने खळबळ

रोहित गोळे

Walmik Karad Arrest: जर चौकशीत धनंजय मुंडे यांचं नाव समोर आलं तर देखील तुरुंगात जाऊ शकतात. असं मोठं विधान भाजप आमदार सुरेश धस यांनी केलं आहे.

ADVERTISEMENT

सुरेश धस यांची धनंजय मुंडेंवर जोरदार टीका
सुरेश धस यांची धनंजय मुंडेंवर जोरदार टीका
social share
google news

बातम्या हायलाइट

point

वाल्मिक कराड अखेर आला पोलिसांना शरण

point

धनंजय मुंडे हे देखील तुरूंगात जाऊ शकतात, सुरेश धसांचं मोठं विधान

point

पाहा धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत सुरेश धस काय म्हणाले

Dhananjay Munde in Trouble: मुंबई: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराड हे आता पोलिसांना शरण आले आहेत. पण त्यानंतर या संपूर्ण प्रकरणी आवाज उठवणाऱ्या भाजप आमदार सुरेश धस यांनी आता एक खळबळ उडवून देणारं विधान केलं आहे. (santosh deshmukh murder case dhananjay munde can also go to jail suresh dhas statement after walmik karad arrest)

'मी आकांचे आका (धनंजय मुंडे) यांच्या अटकेची मागणी केलेली नाही. चौकशीत जर त्यांचं नाव समोर आलं तर आकांचे आकाही आत येऊ शकतात.' असं विधान करत सुरेश धस यांनी आता या प्रकरणी मोठं वक्तव्य केलं आहे.

वाल्मिक कराड पोलिसांना शरण, सुरेश धसांचं मोठं विधान... 

'या राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या अॅक्शनमुळे दाखवलेल्या तत्परतेमुळे शेवटी सीआयडीच्या समोर वाल्मिक कराडला शरण यावं लागलं आहे. प्रथमत: मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाचे आभार मानतो.' असं धस यावेळी म्हणाले. 

'वाल्मिक कराडची संपत्ती जप्त झालीच पाहिजे, अन्यथा...'

'आता त्यांची संपत्ती जप्त करण्याबाबत सीआयडीने कोर्टाकडे परवानगी मागितली आहे. ही न्यायालयीन बाब आहे. त्यामुळे मी त्यावर फार बोलू इच्छित नाही. पण लवकरात लवकर त्यांच्या संपत्ती या जप्त झाल्या पाहिजे. संपत्ती जप्त झाल्याशिवाय अन्य गुन्हे जे हे आका करत होते ते उघडे पडणार नाही. यांच्या संपत्ती जप्त झालीच पाहिजे अन्यथा आम्हाला दुसरा मार्ग अवलंबवा लागतो की काय? असं या ठिकाणी मला म्हणायचं आहे.'

हे ही वाचा>> Walmik Karad Surrender : "...तर न्यायालय देईल ती शिक्षा मला मान्य", वाल्मिक कराड पुणे पोलिसांना शरण

'या प्रकरणातील आणखी तीन आरोपी.. ज्यामध्ये सुदर्शन घुले हा जो प्रमुख आरोपी आहे.. ज्याने सुरुवातीला संतोष देशमुख यांना गाडीच्या खाली खेचून थेट त्यांच्या गाडीमध्ये कोंबलेलं आहे. मारहाणीत देखील सर्वाधिक तो आणि प्रतिक घुले या दोघांचा सहभाग जास्त होता.' 

'विष्णू चाटे याला 120 ब मध्ये अटक केली आहे. परंतु त्याला जर व्हिडीओ कॉलिंग करून दाखवलं असेल तर तो सुद्धा 302 मध्ये येईल. आता हे जे आका शरण आलेले आहेत. हे 100 टक्के जर 120 ब मध्ये तर येतीलच. पण माझा अंदाज आहे की, जर का त्यांनीही व्हीडिओ कॉल पाहिला असेल तर ते सुद्धा 302 मध्ये या ठिकाणी येऊ शकतात.' असं सुरेश धस म्हणाले.

'आकानेच माणसं पाठवलेली...'

'राजकीय हेतू पूरस्सर कारवाई हे आता जोडायचं झालंय. कशाचं राजकारण आणि कशाचं काय? आम्ही कोणी राज्यकर्त्यांनी तुम्हाला सांगितलं होतं का, इतक्या चुकीच्या पद्धतीने संतोष देशमुखला मारा म्हणून?' 

'उगाच स्वत:च्या अंगावर आलं म्हणून काही तरी ते बोलातयेत.. माझं मत असं आहे की, तुम्हाला कोणी उद्योग सांगितला होता? ही अशीच घटना ऑक्टोबर 2023 ला माझ्या मतदारसंघातील पाटोदा तालुक्यात घडली होती. ओटू कंपनीचे बंडगर नावाचे असेच अधिकार उचलून नेत होते. त्या ठिकाणी हे काय परळी पॅटर्न आमच्या पाटोद्यात आणू नका असं मी स्वत: बोललो होतो. त्यामुळे त्या माणसाला सोडून दिलं होतं.' 

हे ही वाचा>> Vijay Wadettiwar : "वाल्मिक कराडने पुरावे नष्ट केल्यावर सरेंडर केलं?", घटनाक्रम सांगत विजय वडेट्टीवार काय म्हणाले?

'नाहीतर कंपनीचा खालचा अधिकारी उचलायचा आणि त्याच्या वरच्या अधिकाऱ्याला फोन करायचा हमने इसको उठा के लाया है.. इतने.. इतने दो..  नाहीतर खतम.. अशाप्रकारच्या धमक्या पचल्यामुळे हे आता दोन कोटीची खंडणी मागण्याची हिंमत झाली. त्यातील 50 लाख रुपये आधीच पोहचले होते. राहिलेल्या दीड कोटीसाठी.. ही माणसं कोणी पाठवली होती? या आकांनीच पाठवली होती.' असा आरोप सुरेश धस यांनी वाल्मिक कराडवर केला आहे. 

'वाल्मिक कराडवर सुद्धा मोक्का लागेल..'

'यामुळे आका या गुन्ह्याच्या बाहेर राहील असं वाटत नाही. मुख्यमंत्र्यांनी आधीच मोक्काची घोषणा केली आहे. त्यामुळे या केसमध्ये 302, 120 ब, खंडणी हे सर्व कलम सगळ्या आरोपींवर लागणार आहेत. हे मी नाही तर राज्याच्या सर्वोच्च व्यक्तीने ही घोषणा केली आहे.' 

'मी आता मुख्यमंत्र्यांकडे गेलो होतो. जामिनापुरती जे सरकारी वकील नेमले आहे त्यात एका शब्दाची त्रुटी आहे. ती त्रुटी दुरुस्ती करता यावी यासाठी मी त्यांची भेट घेतली.' असं म्हणत सुरेश धसांनी कराडवर मोक्काची मागणी केली आहे.

'धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याचा अधिकार हा संपूर्णपणे अजितदादांचा'

'धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याचा अधिकार हा संपूर्णपणे अजितदादा पवार यांचा आहे. यामुळे त्यावर मी फार काही बोलणार नाही. सरकारचं नाव खराब होतंय.. पण मी फार छोटा माणूस आहे. मी पावणे तीन तालुक्यांचा आमदार आहे. मी या बाबीवर निर्णय करू शकत नाही.' 

'उज्ज्वल निकम साहेब यांची या प्रकरणात सरकारी वकील नियुक्ती व्हावी असंही मी पत्र दिलं आहे. आता साहेब मला भेटणार नाही की उद्याची वेळ मिळेल. मी विनंती करणार आहे.'

'वाल्मिक कराडच्या घरापर्यंत पोलीस पोहचले, इतर ठिकाणीही उचलाउचली सुरू झाली. त्यामुळेच ते शरण आले आहेत. ते काय सहजासहजी, स्वखुशीने शरण आलेले नाही.' असा दावा सुरेश धसांनी केलाए.  

'पालकमंत्री हे झंटा फंटा कार्यक्रम आहेत...'

'अहो पालकमंत्री हे झंटा फंटा कार्यक्रम आहेत ते.. द्या सोडून.. पालकमंत्री पदाबाबत मी देखील मागणी केली आहे. की, विशेष बाब म्हणून फडणवीस साहेब यांनी आमच्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद स्वीकारावं. एक आव्हानात्मक म्हणून त्यांनी गडचिरोलीचं पालकमंत्री पद स्वीकारलं होतं. तसं आव्हानात्मक.. जे आहेत ना राख चोर, खडी चोर, मुरूम चोर हे सगळे चोर एका लाइनमध्ये सरळ करायचे असतील तर त्याचं एकमेव उत्तर म्हणजे काय तर फडणवीस साहेब हे आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावे.' असं म्हणत सुरेश धस यांनी एक नवा राजकीय डाव टाकला आहे.

'...तर आकांचे आकाही आत येऊ शकतात', धस यांचं मोठं विधान

'आकाचे आकावर मी बोललेलो नाही. त्यांच्या पक्षाचे मंत्री बोललेले आहेत. माझं म्हणणं एकच आहे की, आकांच्या आकांना (धनंजय मुंडे) किमान ही चौकशी होईपर्यंत आणि चार्जशीट दाखल होईपर्यंत आकांना बिनखात्याचं मंत्री करावं. अशी त्यांच्याच पक्षाच्या प्रकाश सोळंखे यांची मागणी आहे.' 

'मी आकांचे आका (धनंजय मुंडे) यांच्या अटकेची मागणी केलेली नाही. चौकशीत जर त्यांचं नाव समोर आलं तर आकांचे आकाही आत येऊ शकतात.' असं मोठं विधान सुरेश धस यांनी माध्यमांशी बोलताना केलं आहे.


 

हे वाचलं का?

    follow whatsapp