बर्गर खाणं बेतलं जीवावर! HR मॅनेजरची चाकूने भोसकून हत्या; नेमकं काय घडलं?

मुंबई तक

06 Oct 2026 (अपडेटेड: 06 Oct 2026, 11:17 AM)

फरिदाबादमधील एका खासगी कंपनीतील एचआर मॅनेजर बर्गर खाण्यासाठी गेला होता. यावेळी तिथे उपस्थित असणाऱ्यांसोबत त्याचा वाद झाला. या वादात त्याची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली.

Crime News

Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

बर्गर खाणं बेतलं जीवावर!

point

HR मॅनेजरची चाकूने भोसकून हत्या

point

नेमकं काय घडलं?

Crime News : एका बर्गरच्या गाड्यावर झालेल्या क्षुल्लक वादातून 45 वर्षीय व्यक्तीची चाकू भोसकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हिंसक चकमकीत मृताचा पुतण्या गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या संपूर्ण वादाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. फरीदाबादमधील सेक्टर 62 मधील परिसरात ही घटना घडली.

हे वाचलं का?

बर्गरच्या गाड्यावर काय घडलं?

लक्ष्मण भारद्वाज असे मृत व्यक्तीचे नाव असून ते साहुपुरा गावातील रहिवासी होते आणि दिल्लीतील एका खाजगी कंपनीत एचआर मॅनेजर म्हणून कार्यरत होते. घटनेच्या दिवशी ते त्यांचा पुतण्या महेश याच्यासह घरगुती सामान खरेदी करण्यासाठी बाजारात गेले होते. सामान घेतल्यानंतर दोघेही बर्गर खाण्यासाठी गाड्यावर थांबले असता, बर्गर विक्रेत्यासोबत त्यांचा कोणत्यातरी कारणावरून वाद झाला. हा वाद पाहता पाहता विकोपाला गेला आणि तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले.

हे ही वाचा : बारामती दुहेरी हत्याकांडात 7 दिवसांनी सर्वात मोठा खुलासा, आरोपी सापडला

बर्गर विक्रेत्याचा हात?

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, गाड्यावर उपस्थित असलेल्या काही दारूच्या नशेत असलेल्या तरुणांनी लक्ष्मण आणि महेश यांच्यावर हल्ला चढवला. या वादादरम्यान एका तरुणाने लक्ष्मण यांच्यावर चाकूने वार केले, ज्यात ते गंभीर जखमी झाले आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात महेश हादेखील जखमी झाला. या हत्येप्रकरणी बर्गर विक्रेता आणि त्या तरुणांचा हात असल्याचा आरोप करत मृताच्या नातेवाईकांनी आरोपींच्या तात्काळ अटकेची व कडक कारवाईची मागणी केली आहे.

हे ही वाचा : Mumbai Adivasi Student Protest | पोलिसांनी ताब्यात घेतलं? नेमकं काय घडलं?

कुटुंबियांचा आरोप काय?

या परिसरात उघड्यावर दारू पिण्याचे प्रकार सर्रास चालत असून, समाजकंटकांच्या वावरामुळे महिला आणि मुलींना तिथून जाणे कठीण झाल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. संशयितांची ओळख पटवण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे, तसेच कुटुंबीयांनी केलेल्या सर्व आरोपांची पोलीस गांभीर्याने चौकशी करत आहेत.