तुळजापूर : तुळजापुरातील ‘हॉटेल भाग्यश्री’ पुन्हा एकदा दगडफेकीच्या घटनेमुळे चर्चेत आलं आहे. गेल्या पंधरा दिवसात दुसऱ्यांदा घडलेल्या या घटनेत हॉटेलच्या बोर्ड आणि फ्लेक्सचे नुकसान झालं असून, सुमारे 20 हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> डायरी समोर आली, वर्षभरानंतर कळलं बहिणीचा अंत का झाला... प्रियकरावर गुन्हा दाखल, घटना काय?
हॉटेल मालक नागेश मडके यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतलं आहे. अहमदाबाद येथील मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी हॉटेल बंद ठेवण्यात आलं होतं. याचा गैरफायदा घेत काही समाजकंटकांनी हॉटेलवर दगडफेक केल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून, हॉटेल मालकाने आपल्या जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त केली आहे.
हे ही वाचा >> केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश, 7 जणांचा मृत्यू, मृतांपैकी 3 जण महाराष्ट्रातील यवतमाळचे
यापूर्वीही हॉटेल बंद असताना अशीच दगडफेकीची घटना घडली होती, त्यामुळे अवघ्या पंधरा दिवसांत हा दुसरा हल्ला आहे. स्थानिकांनी या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्यांवर उदाहरणात्मक शिक्षा व्हावी, असं मत व्यक्त केलं आहे.
दरम्यान, पोलिसांनी तपास सुरू केला असून, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पावले उचलली आहेत. यापूर्वीही काही दिवसांपूर्वी हॉटेलची तोडफोड करण्यात आली होती. त्यावेळी काही मुलांचे रील व्हायरल झाले होते. त्यामध्ये त्यांनी हॉटेल मालकाला शिवीगाळ करत तोडफोड करत असल्याचं सांगितं होतं.
ADVERTISEMENT
