Wife Kills Husband Viral News : देशाची राजधानी दिल्लीतून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेचं कनेक्शन उत्तरप्रदेशमध्ये असल्याचं समजते. दिल्लीत एका महिलेनं तिच्या पतीची हत्या केली. मोहम्मद शाहिद असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी महिलेला अटक केली आहे. दोघेही पती-पत्नी बरेलीचे रहिवाशी असल्याचं बोललं जात आहे.
ADVERTISEMENT
पोलिसांच्या माहितीनुसार, महिलेनं आधी तिच्या पतीची हत्या केली. त्यानंतर पोलिसांना खोटी माहिती सांगून चकवा देण्याचा प्रयत्न केला. पण तपासादरम्यान पोलिसांना जेव्हा संशय आला, तेव्हा पोलिसांनी महिलेची कसून चौकशी केली. त्यावेळी घटनेमागचं सत्य समोर आलं. पोलिसांनी दावा केला आहे की, आरोपी महिलेनं म्हटलं, तिचा पती तिला शारीरिकदृष्ट्या तृप्त करत नव्हता. त्यामुळे तिने त्याची हत्या केली. फरजाना असं आरोपी महिलेचं नाव असल्याचं म्हटलं जातंय.
हे ही वाचा >> प्रेयसीसोबत सतत शारीरिक संबंध, गरोदर राहिली पण... पुण्यातील महिलेवर लैंगिक अत्याचार
महिला पतीला घेऊन रुग्णालयात पोहोचली अन्..
20 जुलैच्या सायंकाळी जवळपास 4 वाजून 15 मिनिटांनी दिल्लीतील निहाल विहार पोलीस ठाण्यात रुग्णालयातून फोन आला. एक महिला तिच्या पतीसोबत आली आहे, त्याच्या शरीरावर चाकून हल्ला करण्यात आला आहे. पतीची मृत्यू झाला आहे, अशी माहिती खबऱ्याने पोलिसांना दिली. त्यानंतर दिल्ली पोलिसांची एक टीम तातडीनं रुग्णालयात पोहोचली. तेव्हा महिलेनं पोलिसांना सांगितलं की, पतीने स्वत:ला चाकू मारून आत्महत्या केली.
पोस्टमार्टम रिपोर्टमुळे सत्य आलं समोर
पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये पोलिसांना समजलं की, जे चाकूचे निशाण होते, ते स्वत: मारून येऊ शकत नाहीत. ज्याप्रकारे चाकूचे निशाण होते, यावरून स्पष्ट होतं की, तरुणाला चाकूने मारण्यात आलंय. त्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत तपास सुरु केला. पोलिसांनी शाहिदच्या पत्नीला रिमांडवर घेतलं आणि तिचा मोबाईल तपासला, तेव्हा सत्य समोर आलं.
हे ही वाचा >> कॉलेजला सोडण्याच्या बहाण्याने विद्यार्थीनीला नेलं घरी, नंतर केलं लैंगिक शोषण, जर कोणाला सांगितलं तर....दिली धमकी
ADVERTISEMENT
