Husband Shocking Murder Case Viral : दिल्लीच्या निहाल विहार परिसरात एक धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली. येथील फरजान नावाच्या महिलेनं तिचा पती मोहम्मद शाहिदची निर्घृण हत्या केली. पोलिसांनी या हत्याप्रकरणी आरोपी महिलेला अटक केलीय. धक्कादायक बाब म्हणजे, पती-पत्नी दोघेही मूळचे बरेली येथील रहिवासी आहेत.
ADVERTISEMENT
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पत्नीन आधी पतीचा खून केला. नंतर पोलीस अधिकाऱ्यांना खोटी माहिती सांगितली. पतीने आत्महत्या केल्याचं पत्नीने पोलिसांना सांगितलं. दरम्यान, पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर या धक्कादायक घटनेमागचं सत्य उघडकीस आलं. पोलिसांचं म्हणणं आहे की, आरोपी महिलेनं चौकशीदरम्यान गुन्हा कबूल केला. पती शारीरिक संबंध करताना खूश करत नव्हता, त्यामुळे त्याची हत्या केली, असं आरोपी महिलेनं पोलिसांना सांगितलं.
रुग्णालयातून पोलिसांना फोन आला अन्..
ही संपूर्ण घटना 20 जुलै रोजी सायंकाळी 4.15 वाजताच्या सुमारास घडली. एका रुग्णालयातून दिल्लीच्या निहाल विहार पोलीस स्टेशनमध्ये फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीनं पोलिसांना सांगितलं की, एक महिला तिच्या पतीला घेऊन रुग्णालयात आलीय. त्या व्यक्तीच्या शरीरावर चाकूने वार केले आहेत आणि तिचा मृत्यू झालाय. त्यानंतर दिल्ली पोलिसांचं एक पथक रुग्णालयात पोहोचलं आणि महिलेची भेट घेतली. तेव्हा त्या महिलेनं पोलिसांना खोटी माहिती दिली. तिने म्हटलं, पतीने स्वत:वर चाकूने हल्ला करत आत्महत्या केलीय.
हे ही वाचा >> कल्याण: 'आधी तिने माझ्या सुनेच्या कानाखाली मारली, नंतर..', मराठी तरूणीच्या मारहाणीचा नवा VIDEO आला समोर!
पोस्टमार्टम रिपोरटमुळे महिलेचा झाला पर्दाफाश
जेव्हा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला. तेव्हा रिपोर्टमध्ये उघडकीस आलं की, शरीरावर असलेले चाकूचे वार स्वत:ने हल्ला केलेले नाहीत. तर दुसऱ्या व्यक्तीने चाकूने वार केल्याने महिलेच्या पतीचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी तातडीनं हत्येचा गुन्हा दाखल करून याप्रकरणी कसून तपास सुरु केला.
पोलिसांनी जेव्हा मोहम्मद शाहिदच्या पत्नीची कसून चौकशी केली, तेव्हा तिच्या फोनही तपासण्यात आला. त्या फोनमध्ये पोलिसांना खळबळजनक माहिती सापडली. महिलेच्या फोनमध्ये सर्च हिस्ट्री तपासण्यात आली. चॅट कसं डिलीट करायचं, अशाप्रकारचा डेटा आरोपी महिलेनं इंटरनेटवर सर्च केला होता. त्यानंतर पोलिसांनी महिलेला पुन्हा रिमांडवर घेतलं आणि तिने कबुल केलं की, पतीच्या हत्येचा कट तिनेच रचला होता.
हे ही वाचा >> प्रेयसीसोबत सतत शारीरिक संबंध, गरोदर राहिली पण... पुण्यातील महिलेवर लैंगिक अत्याचार
ADVERTISEMENT
