विवाहबाह्य संबंधात आंधळा पती बनला हैवान! पत्नीच्या हत्येनंतर मृतदेह पुरला अन् कुत्र्यालाही ठार करून त्याच खड्ड्यात पुरलं...

एका तरुणाने त्याच्या प्रेयसीच्या मदतीने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केली आणि नंतर तिचा मृतदेह प्रेयसीच्या गावाजवळील रिकाम्या जमिनीत पुरला. पुरावे मिटवण्यासाठी आणि दुर्गंध येऊ नये, म्हणून आरोपीने एका कुत्र्याचीही हत्या करून तोच खड्ड्यात टाकला.

विवाहबाह्य संबंधात आंधळा पती बनला हैवान!

विवाहबाह्य संबंधात आंधळा पती बनला हैवान!

मुंबई तक

• 09:00 AM • 05 Jan 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

विवाहबाह्य संबंधात आंधळा पती बनला हैवान!

point

पत्नीची हत्या करून मृतदेह पुरला अन्...

point

कुत्र्यालाही ठार करून त्याच खड्ड्यात पुरलं

Crime News: झारखंडच्या पलामू जिल्ह्यातील बिश्रामपुर पोलीस स्टेशन हद्दीतील एक धक्कादायक आणि क्रूर घटना समोर आली आहे. येथे एका तरुणाने त्याच्या प्रेयसीच्या मदतीने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केली आणि नंतर तिचा मृतदेह प्रेयसीच्या गावाजवळील रिकाम्या जमिनीत पुरला. पुरावे मिटवण्यासाठी आणि दुर्गंध येऊ नये, म्हणून आरोपीने एका कुत्र्याचीही हत्या करून तोच खड्ड्यात टाकला, जेणेकरून लोकांना वाटेल की वास कुत्र्याच्या मृतदेहाचा आहे. 

हे वाचलं का?

तपासादरम्यान, पीडितेच्या पतीवर संशय 

मृत महिलेचे नाव प्रियंका देवी ऊर्फ पूजा असून सात वर्षांपूर्वी तिचं लग्न कौडिया भुखला गावातील रंजीत मेहता याच्याशी झाला होता. प्रियंका 26 डिसेंबरपासून बेपत्ता होती. कुटुंबियांनी तिच्याशी बऱ्याचदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु तिचा मोबाईल नेहमी बंद होता. त्यानंतर त्यांनी बिश्रामपूर पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पोलीस तपासात मृत महिलेचा पती रंजीत मेहता याचं वागणं संशयास्पद वाटू लागलं. गावात प्रियंकाच्या हत्येच्या चर्चा सुरू झाल्या. स्थानिक लोकांनाही आरोपीच्या हालचालींवर संशय आला. त्यामुळे पोलिसांनी प्रकरणाचा कठोर तपास सुरू केला. 

हे ही वाचा: ठाणे: 20 हजार लाच मागितली, ACB ने पोलीस अधिकाऱ्याला रंगेहात पकडलं! ठाणे पोलीस दलात खळबळ

पाच फूट खोल खड्ड्यात महिलेचा मृतदेह 

गुरुवारी मजिस्ट्रेटच्या उपस्थितीत जेसीबीच्या साहाय्याने टुकबेरा गावाजवळील रिकाम्या जमिनीत खोदकाम केलं. त्यानंतर, पाच फूट खोल खड्ड्यातून प्रियंकाचा मृतदेह बाहेर काढला गेला आणि तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. पोलिसांच्या मते, आरोपी पतीने पत्नीच्या हत्येनंतर लगेच तिचा मृतदेह खड्ड्यात पुरला. दुर्गंध येऊ नये म्हणून कुत्र्याची हत्या करून त्यालाही त्या खड्ड्यात टाकलं. तपासात असंही समोर आलं की, चार दिवसांनंतर आरोपीने पुन्हा खड्डा खोदून कुत्रा पुरण्याचं नाटक केलं.

हे ही वाचा: नवी मुंबई: पत्नी आणि तिच्या मामाकडून अश्लील व्हिडीओ पाठवून छळ, सतत चॅटिंग अन्... अखेर, तरुणाचं टोकाचं पाऊल

मृतदेह सापडल्यानंतर प्रियंकाच्या कुटुंबियांनी पती रंजीत मेहता, त्याची प्रेयसी आणि प्रेयसीच्या वडिलांसह इतरांविरुद्ध नाव नोंदवून एफआयआर दाखल केली. त्यानंतर, पोलिसांनी पत्नीची हत्या, कट रचणे आणि पुरावे नष्ट करण्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. सध्या मुख्य आरोपी रंजीत आणि त्याची प्रेयसी फरार असून पोलीस त्यांच्या अटकेसाठी सतत छापे टाकत आहेत. संबंधित घटनेमुळे स्थानिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. 

    follow whatsapp