हैद्राबादमध्ये गणेश विसर्जनाच्या बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षकासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप एका फिटनेस क्लबच्या मालकावर करण्यात आला आहे. अल्मासगुडा परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी मेरपेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित व्यक्तीने महिला अधिकाऱ्याला तिचे शासकीय कर्तव्य बजावण्यापासून रोखल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : पैशांचा हव्यास ते डॉक्टरला मारहाण; दिव्या शिंदेने जे कांड केले ते वाचाच, 10 गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल
घटनास्थळी गोंधळ होत असल्याची माहिती, महिला अधिकारी पोहोचल्या अन्..
महिला पोलीस उपनिरीक्षक देवुलापल्ली उमा महेश्वरी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 23 सप्टेंबर रोजी पहाटे सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास अल्मासगुडा कमान आणि श्लोका स्कूलजवळ ही घटना घडली. हा परिसर मेरपेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. गणेश विसर्जनाच्या बंदोबस्तासाठी त्या परिसरात तैनात होत्या. यावेळी ऑक्सिजन फिटनेस क्लबजवळ काही जण गोंधळ घालत असल्याचे आणि त्यामुळे नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
हेही वाचा : अपक्ष आमदार सत्यजीत तांबेंच्या वाढदिवशी फडणवीसांची पोस्ट; राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चेला उधाण
अयोग्य भाषेचा वापर करत शासकीय कर्तव्यात अडथळा आणला
रात्री उशिराची वेळ असल्याने महिला उपनिरीक्षकांनी त्या ठिकाणी जाऊन संबंधितांना तेथून जाण्यास सांगितले. यावेळी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने त्यांच्यासोबत कथितरित्या गैरवर्तन केले. तसेच अयोग्य भाषेचा वापर करत त्यांच्या शासकीय कर्तव्यात अडथळा आणल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या व्यक्तीची ओळख साकेत कुमार अशी करण्यात आली असून तो ऑक्सिजन फिटनेस क्लबचा मालक असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी महिला उपनिरीक्षकांची तक्रार 24 सप्टेंबर रोजी रात्री सुमारे 10 वाजता मेरपेट पोलीस ठाण्यात प्राप्त झाली. त्यानंतर पोलिसांनी क्राईम क्रमांक 134/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 74, 75(2) आणि 132 नुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक सी.एच. निखिल रेड्डी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ADVERTISEMENT












