Ketan Agrawal Murder case : केतन अग्रवाल हत्याकांडात आता पोलीस नवनवीन खुलासे करत आहेत. पोलिसांनी प्रकरणाची चौकशी केली असता, सियाचा आणखी एक मोबाईल तिच्या घरातून जप्त केला आहे. पोलिसांनी संबंधित मोबाईल जप्त केल्यानंतर तरुणीच्या सर्च हिस्टरीची माहिती मिळवलेली आहे. केतनची केलेली हत्या केवळ एक हत्या नसून अगदी शांत डोक्याने केलेला हा एक कटच होता.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : विवाहित महिलेचं भाच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिप, नंतर दोघांचाही मृत्यू
मोबाईल फोनच्या सर्च हिस्टरीचा तपास
मोबाईल फोनची सर्च हिस्टरी तपासल्यानंतर समोर आले की, तिने मेघालयाच्या राजा रघुवंशी हत्याकांडाबाबत सर्च केलं. सोनम नावाच्या महिलेनं पती राजा रघुवंशीला डोंगरावरून धक्का देऊन त्याची हत्या केली होती. सियाने याच प्रकरणाचा पूर्ण शोध घेतला. सिमा ज्या कारणाने पोलिसांच्या हाती आली, तशीच आपल्या हातून चूक होऊ नये, असा त्या मागील हेतू होता.
सियाच्या फोनच्या हिस्ट्ररीतून समजलं की, सियाने इंटरनेटवर पोलीस महिलांसोबत मारहाण करतात की नाही याचा तपास केला. यामुळे तिला अंदाज होता की, कदाचित ती पकडली देखील जाऊ शकते. तिने कोणत्याच हत्यारांची मदत घेतली नाही, तसेच ती घटनास्थळावरून पळून देखील गेली नाही. तिने केतनला लोहगडावरून धक्का दिला आणि तिने रचलेला कट सत्यात उतरवला.
मिडल फिंगर दाखवल्याने सिया ट्रोल
अशातच सियाने पोलिसांसोबत जाताना आपली मिडल फिंगर दाखवली होती. तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, यावरून तिला ट्रोल देखील करण्यात आले. ,सियाच्या वडिलांनी सांगितलं की, तिच्या मधल्या बोटाला जखम झाली होती. ती काहीही चुकीचा इशारा करत नव्हती. अशातच पोलीस सियाचा बॉयफ्रेंड चेतन चौधरीचा देखील तपास करत आहेत. तो वेगवेगळ्या सिम कार्डचा वापर करत होता. यामुळे त्या सिमकार्डचा शोध घेणं सुरू आहे.
तपासातून पोलीस झाले हैरान
सियाच्या थंड डोक्याने केलेल्या या कृत्यावर पोलीस अधिकारी देखील हैरान झालेले आहेत. ओडिशाचे एडीजीपी आणि क्राईम ब्रांच अधिकारी सीनियर आयपीएस अरुण बोथरा यांनी सोशल मीडियावर आपलं मत व्यक्त केला, ते म्हणाले की, "आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी असंख्य गुन्हेगारांची चौकशी केली. कुख्यात गुन्हेगारांचाही सामना केला आहे. सहसा, गंभीर गुन्हा केल्यानंतर गुन्हेगारांच्या चेहऱ्यावर भीती, पश्चात्ताप किंवा इतर काही भाव दिसतात, ज्यावरून मानवी वर्तणूक तज्ज्ञांना त्यांच्या मानसिकतेचा अंदाज लावता येतो.
हे ही वाचा : साताऱ्यात जीपवर झाड कोसळून सहा जण जखमी, प्रवाशांची ओळख समोर
त्यानंतर पुढे त्यांनी लिहिलं की, मात्र या सियाते आतापर्यंत पाहिलेल्या गुन्हेगारांहून पू्र्णपणे वागणे वेगळे आहे. तरुणाच्या हत्येनंतर तिच्या चेहऱ्यावर किंचितशीही भीती वाटत नाही. न्यायालयात तिचा बेफिकीरपणा दिसून येतो.
ADVERTISEMENT












