भरदिवसा नग्न झाले आणि स्मशानभूमीत केला अघोरी प्रकार, कोल्हापुरातील विचित्र घटना काय? CCTV समोर

अलीकडेच जयसिंगपूरच्या एका वृद्धाचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्यावर वैकुंठधामात अंत्यसंस्कार करण्यात आले. रक्षा विसर्जनाच्या दिवशी नातेवाईक वैकुंठधामात आले असता, अंत्यसंस्काराच्या ठिकाणी राख बाजूला करून बाहुली, नारळ यांच्या पूजेसह नावाच्या चिठ्ठ्यां ठेवलेल्या आढळल्या.

Mumbai Tak

मुंबई तक

20 Jun 2025 (अपडेटेड: 20 Jun 2025, 09:40 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

कोल्हापुरातील स्मशानभूमीत काळी जादू

point

काळी जादू करताना नग्न होऊन विचित्र प्रकार

कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील उदगांव येथील कृष्णा नदीकाठावरील वैकुंठधामात धक्कादायक प्रकार समोर आलाय. गेल्या काही दिवसांपासून भरदिवसा महिला आणि पुरुषांकडून नग्न होऊन करणी-भानामतीचे अघोरी प्रकार सुरू असल्याची धक्कादायक घटनाक्रम सुरू आहे. हा सर्व प्रकार वैकुंठधामातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत कैद झाले असून, यामुळे उदगाव, जयसिंगपूरसह परिसरात खळबळ उडाली आहे. सरपंच सलीम पेंढारी यांनी जयसिंगपूर पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

हे वाचलं का?

नेमकं काय घडलं? 

उदगांव वैकुंठधावकुंठधाम हे उदगांव, जयसिंगपूर, संभाजीपूर, चिपरी बेघर, धरणगुत्ती, मौजे आगर या गावांतील मृतांवरील अंत्यसंस्कारासाठी वापरलं जाणारं स्मशान आहे. इथं नेहमीच नातेवाइकांची गर्दी असते. अलीकडेच जयसिंगपूरच्या एका वृद्धाचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्यावर वैकुंठधामात अंत्यसंस्कार करण्यात आले. रक्षा विसर्जनाच्या दिवशी नातेवाईक वैकुंठधामात आले असता, अंत्यसंस्काराच्या ठिकाणी राख बाजूला करून बाहुली, नारळ यांच्या पूजेसह नावाच्या चिठ्ठ्यांमध्ये सुया खुपसून करणी-भानामतीचा प्रकार झाल्याचे उघडकीस आले.

भर दिवसा नग्न होऊन अघोरी पूजा

नातेवाइकांनी याचा शोध घेतला असता, वैकुंठधामातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात महिला आणि पुरुष वेगवेगळ्या वेळी, विशेषत: अमावस्या, पौर्णिमा, शनिवार आणि बुधवार या दिवशी भरदिवसा नग्न होऊन अघोरी पूजा करत असल्याचं दिसून आलं. या प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, अंधश्रद्धेच्या या धक्कादायक कृत्यांमुळे स्थानिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

हे ही वाचा >> लाखाचे कोटी करुन देतो म्हणत फसवणूक, पोलिसांनी आरोपीच्या घरावर छापा टाकल्यावर सापडली, कवटी, दोरे...

उदगाव ग्रामस्थांकडून होतेय. "वैकुंठधामासारख्या पवित्र ठिकाणी असे अंधश्रद्धेचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. ग्रामपंचायत यावर कठोर कारवाई करेल आणि अशा कृत्यांना आळा घालण्यासाठी उपाययोजना करेल," असं सरपंच म्हणालेत. तसंच, जयसिंगपूर पोलिसांनी तातडीनं या प्रकरणाचा तपास करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

वैकुंठधामात सातत्याने होणाऱ्या या प्रकारांमुळे स्थानिकांमध्ये भीतीसोबतच संतापाचे वातावरण आहे. "स्मशानभूमी ही अंत्यसंस्काराची पवित्र जागा आहे. अशा ठिकाणी अंधश्रद्धेचे प्रकार होणं अत्यंत निंदनीय आहे. पोलिसांनी त्वरित कारवाई करावी," अशी मागणी उदगावमधील नागरिकांनी केली आहे.

 

    follow whatsapp