पाऊस पडतोय म्हणून थांबली अन् घडलं भयानक, मजुरांनी अल्पवयीन मुलीवर केला सामूहिक बलात्कार

मुंबई तक

• 11:15 AM • 08 Apr 2026

अचानक पाऊस सुरु झाल्याने एक अल्पवयीन मुलगी बांधकाम सुरु असलेल्या इमारतीखाली थांबली होती. मुलीला एकटीच बघून त्याठिकाणी काम करणाऱ्या मजुरांमधील राक्षस जागा झाला. यानंतर त्या अल्पवयीन मुलीसोबत भयानक घटना घटली.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

पाऊस सुरु झाल्याने बांधकामाधीन इमारतीत थांबली

point

मजूरांनी केला अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

Crime News : एका बांधकाम सुरु असलेल्या इमारतीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. पाऊस पडत असल्याने निवाऱ्यासाठी पीडित मुलगी त्याठिकाणी थांबली होती. याचाच फायदा घेत आरोपींनी पीडितेवर अत्याचार केले. मंगळवारी रात्री उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये ही घटना घडली. या घटनेने संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

हे वाचलं का?

पाऊस सुरु झाल्याने थांबली अन्..

पीडित मुलगी शेजारच्या एका घरात लहान मुलांची काळजी घेण्याचे काम करते. मंगळवारी कामावर जात असताना अचानक पाऊस सुरू झाल्याने ती आडोशासाठी जवळच असलेल्या एका निर्माणाधीन इमारतीत शिरली. यावेळी तिथे काम करणाऱ्या एका मजुराने तिला जबरदस्तीने आत ओढले, तर त्याचे इतर साथीदार बाहेर पहारा देत राहिले. पीडितेने विरोध केला असता नराधमांनी तिचे हात-पाय बांधले, तिला मारहाण केली आणि आरडाओरडा करू नये म्हणून तोंडात कापडाचा बोळा कोंबून तिच्यावर अत्याचार केला.

हे ही वाचा : वयाच्या 70 व्या वर्षी अनारकलीचे अनैतिक संबंध, पतीला समजतात तळ पायाची आग मस्तकात गेली; संतापून केलं मोठं कांड

तिसऱ्या मजल्यावर बेशुद्धावस्थेत

मुलगी वेळेवर कामावर न पोहोचल्याने ज्या महिलेकडे ती काम करते, त्यांनी तिचा शोध सुरू केला. स्थानिक नागरिकांना इमारतीबद्दल संशय आल्याने त्यांनी तिसऱ्या मजल्यावर जाऊन तपासणी केली असता, तिथे पीडिता अत्यंत विदारक आणि बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. संतप्त नागरिकांनी इमारतीच्या छतावरील टाकीजवळ लपून बसलेल्या मजुरांना पकडून बेदम चोप दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केले.

हे ही वाचा : वयाच्या 70 व्या वर्षी अनारकलीचे अनैतिक संबंध, पतीला समजतात तळ पायाची आग मस्तकात गेली; संतापून केलं मोठं कांड

पाच मजूर ताब्यात

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पीडितेची सुटका केली आणि तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी याप्रकरणी पाच मजुरांना ताब्यात घेतले असून, ते सर्व उत्तर प्रदेशातील सीतापूर येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. डीसीपी (मध्य) यांनी दिलेल्या माहितीनुसार, वैद्यकीय तपासणीत बलात्कार झाल्याचे आढळले आहे. आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.