Mumbai Crime: महाराष्ट्रातील दोन अल्पवयीन मुलांवर कर्ज फेडता न आल्याने अपमानास्पद परिस्थिती ओढवल्याचं वृत्त समोर आलं आहे. त्या दोघांना गाडीतच ओरल सेक्स करण्यास भाग पाडण्यात आले. इतकेच नव्हे तर या प्रकरणातील आरोपींनी या घाणेरड्या कृत्याचा व्हिडीओ देखील काढला. घटनेतील पीडित मुलाच्या आईने याबद्दल पोलिसात तक्रार केली असता मुंबई पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
ADVERTISEMENT
या प्रकरणातील पीडित तरुण परभणीचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर पीडित तरुणांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर शारीरिक आणि मानसिक उपचार केले जात आहे.
कारमध्ये बांधून ठेवलं अन्...
मिळालेल्या माहितीनुसार, दोन अल्पवयीन मुलांनी एका व्यक्तीकडून काही पैसे उधार घेतले होते. मुलांनी पैसे परत केले नसल्यामुळे कर्ज देणाऱ्याने त्यांना एका गाडीत बांधून ठेवले आणि चालत्या गाडीत त्या पीडितांना नग्न करण्यात आले. नंतर दोन्ही तरुणांना एकमेकांशी ओरल सेक्स करण्यास भाग पाडले. आरोपींनी असं घाणेरडं कृत्य करत असताना व्हिडीओ सुद्धा बनवला.
हे ही वाचा: घरमालकासोबत सुरू होते महिलेचे शरीर संबंध, पतीने रंगेहाथ पकडलं; पत्नी म्हणाली, 'जे सुरू आहे ते गुपचूप पाहा नाहीतर...'
या घटनेतील पीडित तरुणांपैकी एकाचं वय 19 वर्षे असून दुसरा अल्पवयीन असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी 25 वर्षीय तरुण गौतम दिलीप गोस्वामी उर्फ ऋतिकला अटक केली आहे. या गौतम नावाच्या तरुणावर मुलांना कर्ज दिल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इतर आरोपींपैकी एकाची ओळख पंजूभाई गोस्वामी अशी झाली असून इतर दोघांची नावं देराज आणि भरत असल्याचं सांगितलं जात आहे. पोलीस या आरोपींचा शोध घेत आहेत.
हे ही वाचा: मुंबईची खबर: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनबाबत सर्वात मोठी अपडेट, BKC ते शिळफाटापर्यंत थेट...
ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न
पीडित अल्पवयीन मुलाच्या आईने एलटी मार्ग पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. गौतम गोस्वामीने तिच्या मुलाला आणि त्याच्या मित्राला गेल्या शुक्रवारी आमिष दाखवून पळवून नेल्याचं आईने तक्रार करत सांगितलं. हे घाणेरडं कृत्य केल्यानंतर कर्ज घेतलेले पैसे परत न केल्यास व्हिडिओ ऑनलाइन अपलोड करण्याची धमकी देण्यात आली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपी मुलांना पुण्यालाही घेऊन गेले होते. तिथे त्यांना एका खोलीत बांधून ठेवण्यात आले. त्यावेळी त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. मुलांनी पैसे देण्याचे आश्वासन दिल्यावर त्यांना सोडण्यात आले.
ADVERTISEMENT
