Crime News : मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधून माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील नेहरू कॉलनीमध्ये राहणारे 95 वर्षीय वृद्ध रामाधार गुप्ता यांनी स्वतःच्या सून आणि नातेवाईकांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात प्रेमाची आणि सेवेची गरज असताना घरात होणाऱ्या छळामुळे या वृद्धाला टोकाचे पाऊल उचलावे लागल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : पंधरा दिवसात पोटची दोन्ही मुलं मारली; उंदीर मारण्याचं औषध पाजून संपवलं, प्रियकरासोबत मिळून आईने 'असा' रचला कट
पोटावर गोळी झाडली
रामाधार गुप्ता हे व्यवसायाने डेअरी संचालक होते. गुरुवारी त्यांच्या खोलीतून गोळीबाराचा आवाज आल्याने कुटुंबीय हादरून गेले. त्यांनी आपल्या परवानाधारक 12 बोअर रायफलने स्वतःच्या पोटावर गोळी झाडून घेतली. गोळी त्यांच्या पोटातून आरपार निघाली, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.
पोलिसांना सापडली सुसाईड नोट
तपासादरम्यान पोलिसांना रामाधार गुप्ता यांनी लिहिलेली एक सुसाइड नोट सापडली आहे, ज्यामध्ये त्यांनी आपला सर्व त्रास व्यक्त केला आहे. या पत्रात त्यांनी नमूद केले आहे की, त्यांची मोठी सून त्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होती. घरातील सततची भांडणे आणि रोजच्या त्रासामुळे ते पूर्णपणे खचले होते. आयुष्यभराची कमाई आणि सन्मान असूनही, स्वतःच्याच घरात मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे त्यांनी जीवन संपवण्याचा निर्णय घेतला.
हे ही वाचा : 19 वर्षीय तरुणीचा गल्लीतल्या अल्पवयीन मुलावर अपहरण करुन अत्याचार, कोणाला सांगू नये म्हणून धमक्याही दिल्या
सून आणि नातेवाईकांवर गुन्हा
पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून घटनास्थळावरून रायफल आणि सुसाईड नोट जप्त केली आहे. पोलिसांनी सुसाईड नोटच्या आधारे सून आणि संबंधित नातेवाईकांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ज्या वयात ज्येष्ठांना आधाराची गरज असते, त्या वयात त्यांना अशा प्रकारे मृत्यूला कवटाळावे लागल्याने कौटुंबिक संस्कारांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ADVERTISEMENT











