सुनेसोबतच्या वादाला वैतागली, सासूने सात महिन्यांच्या प्रेग्नंट सुनेला संपवले; कुदळीने सपासप वार करत हत्या

Crime News : माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका सासूनेच आपल्या सात महिन्यांच्या गरोदर सुनेची कुदळीने वार करून निर्घृण हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.  या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत अवघ्या काही दिवसांतच धक्कादायक खुलासा केला आहे.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 01:22 PM • 21 Mar 2026

follow google news

Crime News : माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका सासूनेच आपल्या सात महिन्यांच्या गरोदर सुनेची कुदळीने वार करून निर्घृण हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.  या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत अवघ्या काही दिवसांतच धक्कादायक खुलासा केला असून, आरोपी सासूला अटक करून तिची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील ही घटना आहे. 

हे वाचलं का?

घरात रक्ताच्या थारोळ्यात महिला

या घटनेची सुरुवात 14 मार्च रोजी झाली. शिक्षक दयाराम साहू यांनी आपली पत्नी नीता साहू घरात रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध पडल्याची माहिती पोलिसांना दिली. नीताच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर गंभीर जखमांच्या खुणा होत्या. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले, मात्र तोपर्यंत नीताचा मृत्यू झाला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी फॉरेन्सिक टीम आणि श्वानपथकाला पाचारण केले. सुरुवातीला या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू करण्यात आला होता, मात्र पोस्ट मार्टम अहवालात नीताची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले.

हे ही वाचा : सुरुवातीला दहशतवादी हल्ल्याची शंका, मात्र पोलिस तपासात वेगळीच माहिती समोर; 'त्या' ब्लास्ट प्रकरणात नेमकं काय घडलं?

 

सासूने केला गुन्हा मान्य

पोलिसांनी या प्रकरणी सुरुवातीला अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान घरातील सदस्य आणि शेजाऱ्यांची कसून चौकशी करण्यात आली. पोलिसांना तपासात वारंवार मृताच्या सासूच्या वागणुकीवर संशय येत होता. मिळालेले पुरावे आणि सासूच्या विसंगत विधानांमुळे संशय बळावल्याने पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन चौकशी केली. अखेर पोलिसी खाक्या दाखवताच सासूने आपला गुन्हा मान्य केला आणि या निर्घृण हत्येमागील सत्य बाहेर आले.

हे ही वाचा : हॉस्पिटलच्या लिफ्टमध्ये अडकलं कुटुंब, आरडाओरडा केला तरी स्टाफ आलाच नाही; बायको आणि मुलाच्या डोळ्यादेखत वडिलांचा तडफडून मृत्यू

 

कुदळीने वार करुन हत्या

घरगुती वाद आणि सततच्या वादातून आलेल्या रागाच्या भरात आपण हे पाऊल उचलल्याचे आरोपी सासूने कबूल केले. सासूने सांगितले की, 'रागाच्या भरात तिने सुनेवर कुदळीने सपासप वार केले, ज्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.'  पोलिसांनी आरोपीच्या माहितीनुसार हत्येसाठी वापरलेली रक्ताने माखलेली कुदळ जप्त केली आहे. आरोपी सासूला न्यायालयात हजर केले असता, तिची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. एका गरोदर सुनेची तिच्याच सासूकडून झालेली ही हत्या पाहून संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.
 

    follow whatsapp