सुरुवातीला दहशतवादी हल्ल्याची शंका, मात्र पोलिस तपासात वेगळीच माहिती समोर; 'त्या' ब्लास्ट प्रकरणात नेमकं काय घडलं?
Crime News : रुसून माहेरी गेलेल्या बायकोला परत बोलावण्यासाठी एखादा नवरा काय करेल असं वाटतं तुम्हाला? तो आपल्या बायकोचा रुसवा काढेल, जास्त काही असेल तर नातेवाईकांच्या मध्यस्थीने तोडगा काढेल. मात्र मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यातील एका पठ्ठ्याने बॉम्ब बनवून थेट मंदिराजवळ स्फोटच केला आहे. या घटनेमुळे सगळेच जण हैराण झाले आहेत
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सुरुवातीला दहशतवादी हल्ला झाल्याची शंका
मात्र पोलिस तपासात वेगळीच माहिती समोर
'त्या' ब्लास्ट प्रकरणात नेमकं काय घडलं?
Crime News : रुसून माहेरी गेलेल्या बायकोला परत बोलावण्यासाठी एखादा नवरा काय करेल असं वाटतं तुम्हाला? तो आपल्या बायकोचा रुसवा काढेल, जास्त काही असेल तर नातेवाईकांच्या मध्यस्थीने तोडगा काढेल. मात्र मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यातील एका पठ्ठ्याने बॉम्ब बनवून थेट मंदिराजवळ स्फोटच केला आहे. या घटनेमुळे सगळेच जण हैराण झाले आहेत. सुरुवातीला या स्फोटामागे काही दहशतवाद्यांचा हात असल्याची चर्चा रंगली होती. मात्र पोलिस तपासानंतर सर्वांनाच धक्का बसला.
या प्रकरणी 30 वर्षीय आरोपी गोलू पटेल याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या स्फोटात एकाच कुटुंबातील तीन जण जखमी झाले होते. आरोपीने एका ब्लूटूथ स्पीकरमध्ये डेटोनेटरसारखा बॉम्ब फिट करून तो मंदिराच्या परिसरात ठेवला होता. आपल्या सासरच्या मंडळींना यामध्ये गोवण्यासाठी त्याने हा भयानक कट रचल्याचे पोलीस चौकशीत निष्पन्न झाले आहे.
मेव्हण्यांना अडकवण्याची योजना
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गोलू पटेलची पत्नी त्याला सोडून माहेरी निघून गेली होती. तिला परत मिळवण्यासाठी त्याने आपल्या मेव्हण्यांना गुन्ह्यात अडकवण्याची योजना आखली. यासाठी त्याने मंदिराच्या पुजाऱ्याला एक बनावट संदेशही पाठवला होता, ज्यामध्ये त्याने पत्नीच्या भावांच्या नावांचा उल्लेख केला होता. स्फोटानंतर पोलीस त्याच्या मेव्हण्यांना अटक करतील आणि घाबरून त्याची पत्नी परत येईल, असा त्याचा डाव होता. आरोपीने यापूर्वी एका मायनिंग कंपनीत काम केले असल्याने त्याला स्फोटकांचा तांत्रिक अनुभव होता, ज्याचा वापर त्याने हा बॉम्ब बनवण्यासाठी केला.
हे ही वाचा : शिवनिका संस्थानसाठी 39 लाख लिटर पाणी देण्यास देण्यात आली होती मंजुरी, कॅप्टन खरातचा शासन दरबारी होता दबदबा










