Crime News : माणूस किती क्रूर होऊ शकतो याचा प्रत्यय आणून देणारी एक घटना समोर आली आहे. एका नराधमाने आपल्या मित्राचा खून करुन त्याचे शिर धडावेगळे केले. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर ते शिर तलवारीच्या टोकावर ठेवून सबंध गावभर फिरला. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. हा प्रकार नेमका कुठं घडला आणि कुणी ही क्रूर हत्या केली जाणून घेऊया.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : घरच्यांचा विरोध असताना लव्ह मॅरेज, मुलगी झाल्यानंतर दोन वर्षांनी सासरी गेला, पण सासऱ्याने अन् मेहुणीने जागेवर संपवलं
बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यातील ही घटना आहे. सुधांशु कुमार ऊर्फ शर्माजी असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी विकेश पासवान ऊर्फ मलिंगा याच्यासह पाच जणांना अटक केली आहे. तसेच हत्येसाठी वापरलेली तलवार, मृताचे शिर आणि त्याची सायकलदेखील जप्त केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये मलिंगासह राजेश रंजन, अर्जुन पासवान, दीपक आणि नितीश कुमार यांचा समावेश आहे.
दारु व्यवसायावरुन वाद
पोलिसांनी सांगितले की, मुख्य आरोपी मलिंगा आणि मृत सुधांशु हे पूर्वी मित्र होते, मात्र त्यांच्यात अवैध दारू व्यवसायावरून गेल्या काही दिवसांपासून वैमनस्य निर्माण झाले होते. दोघांच्याही नावावर गुन्हेगारी नोंदी असून मलिंगा हा फरार आरोपी होता. सुधांशु आपली हत्या करेल, अशी भीती मलिंगाला वाटत होती. याच भीतीपोटी मलिंगाने 10 मार्चला रस्त्यात सुधांशुला एकटे गाठले आणि आपल्या साथीदारांच्या मदतीने त्याचे पाय तोडून भररस्त्यात तलवारीने त्याचा गळा चिरला.
शिर तलवारीच्या टोकावर ठेवून डान्स
हे हत्याकांड इतके भीषण होते की, हत्या केल्यानंतर आरोपींनी सुधांशुचे कापलेले शिर तलवारीच्या टोकावर खोचून संपूर्ण गावात फिरवले आणि नाचवले. ही क्रूरता पाहून गावकरी हादरले होते, परंतु दहशतीमुळे कोणीही आवाज उठवला नाही. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी धड एका पडीक जमिनीत आणि शिर एका बागेत वेगवेगळ्या ठिकाणी पुरले. इतकेच नाही तर ज्या ठिकाणी धड पुरले होते, तिथे कोणाला संशय येऊ नये म्हणून ट्रॅक्टर चालक राजेश रंजनच्या मदतीने ती जमीन चक्क नांगरून टाकली होती.
हे ही वाचा : चॉकलेट दिले अन् दुकानातच..., दुकानदाराने सहा वर्षांच्या चिमुकलीसोबत काय केले?
अखेर पत्नीनेच दिली तक्रार
सुधांशु बेपत्ता झाल्यानंतर त्याची पत्नी सोनम कुमारी हिने कपडे आणि हातातील काळ्या धाग्यावरून त्याच्या मृतदेहाची ओळख पटवली. विशेष म्हणजे, हत्येनंतरही आरोपी गावातच वावरत होते आणि मृताच्या नातेवाईकांसोबत शोक व्यक्त करण्याचे नाटक करत होते. मात्र, पोलिसांच्या तपासात मलिंगाचे नाव समोर येताच तो फरार झाला, ज्याला नंतर पकडण्यात आले. पोलिसांनी सर्व आरोपींना वैद्यकीय तपासणीनंतर तुरुंगात पाठवले असून, या प्रकरणाचा 'स्पीडी ट्रायल'द्वारे निकाल लावून कठोर शिक्षा देण्याचे आश्वासन दिले आहे.
ADVERTISEMENT











