Crime News : आपल्या समाजात नाती, माणुसकी शिल्लक आहे का असा प्रश्न पडावा अशी घटना समोर आली आहे. लहानपणी आजीने सांगितलेल्या गोष्टी ऐकत-ऐकत आपण मोठे होतो. या गोष्टींमधून आपण चांगला माणूस व्हावं, सर्वांशी आपुलकीनं, प्रेमानं वागावं असे संस्कार आजी आपल्यावर करते. मात्र याच आजीवर नातवाने वाईट नजर ठेवली तर? किती भयानक आहे हे. पण हे प्रत्यक्षात घडलंय. एका नराधम युवकाने आपल्याच चुलत आजीवर बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. मध्यप्रदेशातील राजगड जिल्ह्यातील ही घटना आहे. नेमकं काय घडलं, जाणून घेऊया.
ADVERTISEMENT
अतिरिक्त पोलीस अधीक्षक के.एल. बंजारे यांनी या प्रकरणाचा खुलासा करताना सांगितले की, बुधवारी सकाळी डायल-112 वर माहिती मिळाली होती की, घाटाखेडी गावात एका वृद्ध महिलेवर अज्ञात व्यक्तीने जीवघेणा हल्ला केला आहे. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून जखमी वृद्धेला रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
हे ही वाचा : कोल्हापुरातील नामांकित इंजिनीअरिंग कॉलेजच्या विभागप्रमुखाला अटक, 20 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा आरोप
मध्येच पार्टी सोडून गेला आणि...
या घटनेचा तपास करण्यासाठी पोलिसांनी एफएसएल आणि फिंगरप्रिंट पथकाच्या मदतीने पुरावे गोळा केले. फिर्यादीने (आरोपीचा चुलता) दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री 10 ते 11 च्या दरम्यान शेतात खाण्यापिण्याची पार्टी सुरू होती, ज्यात आरोपी रामनिवास ऊर्फ रायसिंग याच्यासोबत पप्पू भील आणि सुनील भील हे देखील सहभागी झाले होते. फिर्यादी आपल्या वृद्ध आईला शेतातील झोपडीत एकटे सोडून या पार्टीत गेला होता. काही वेळानंतर आरोपी रामनिवास कोणालाही काहीही न सांगता तिथून निघून गेला. सकाळी जेव्हा फिर्यादी आपल्या आईला पाहण्यासाठी झोपडीत पोहोचला, तेव्हा ती तिथे नव्हती. शोध घेतला असता जवळच असलेल्या गव्हाच्या शेतात ती गंभीर जखमी अवस्थेत आढळून आली. तिच्या तोंडातून आणि नाकातून रक्त येत होते आणि जबड्यावर जखमेच्या खुणा होत्या. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी वृद्ध महिला सापडली, तिथेच रामनिवासचे कपडेही पडलेले होते.
आजीवर बऱ्याच काळापासून वाईट नजर
तपासादरम्यान गावकऱ्यांनी पोलिसांना सांगितले की, घटनेच्या रात्री आरोपी नग्न अवस्थेत घरी परतला होता आणि त्याच्या अंगावर रक्ताचे डाग होते. त्यानंतर तो कपडे बदलून गावातून पसार झाला होता. पोलिसांनी घटनास्थळावरून एक मोबाईल फोन, काळ्या रंगाची लोअर आणि रक्ताने माखलेला शर्ट जप्त केला, जो आरोपीने झुडपात लपवून ठेवला होता. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपी रामनिवास रायसिंग भील याला अटक केली. पोलीस चौकशीत आरोपीने आपला गुन्हा कबूल केला. त्याने सांगितले की, तो बऱ्याच काळापासून आपल्या आजीवर वाईट नजर ठेवून होता. 3 मार्च रोजी त्याने एका नियोजित कटाचा भाग म्हणून पार्टीचे आयोजन केले आणि वृद्धेच्या मुलाला (आपल्या चुलत्याला) तिथे अडकवून ठेवले.
हे ही वाचा : 10 मार्चनंतर बुध करणार राहूच्या नक्षत्रात प्रवेश, 'या' राशींच्या लोकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज
नाक आणि तोंडाचा चावा
पार्टीतून गुपचूप बाहेर पडल्यानंतर आरोपी झोपडीत पोहोचला, जिथे वृद्ध महिला एकटीच होती. त्याने तिला बाहेर बोलावले आणि जबरदस्तीने जवळच्या गव्हाच्या शेतात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. जेव्हा पीडितेने प्रतिकार करण्याचा आणि ओरडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आरोपीने क्रूरतेचा कळस गाठत दातांनी तिचे नाक आणि तोंड चावून तिला गंभीर जखमी केले, ज्यात तिचा मृत्यू झाला. अतिरिक्त पोलीस अधीक्षक के.एल. बंजारे यांनी स्पष्ट केले की, अटक केलेला आरोपी हा मृत महिलेचा सख्खा नातू नसून दूरच्या नात्यातील नातू आहे. भोजपूर पोलीस ठाण्याच्या प्रभारी संगीता शर्मा आणि त्यांच्या पथकाने अवघ्या 24 तासांत या गुन्ह्याचा छडा लावून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
ADVERTISEMENT











